शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हृदयविकाराचं आणखी एक नवं कारण आलंय समोर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 15:19 IST

काय आहे हे कारण? सांभाळा स्वत:ला आणि वागा त्याप्रमाणे..

ठळक मुद्देआपल्या रक्तातील फॉस्फेटचं प्रमाण जर प्रमाणापेक्षा कमी असेल, तरीही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.फॉस्फेट म्हणजेच एक प्रकारचं खनीज. आपल्या शरीरात खनिजं आवश्यकच असतात आणि त्यांच्या कमतरतेमुळे विविध प्रकारचे आजारही आपल्याला होऊ शकतात.शास्त्रज्ञांचा दावा आहे की अशा प्रकारची ही जगातली पहिलीच चाचणी आहे.

- मयूर पठाडेनेमका कशामुळे येतो हार्ट अ‍ॅटॅक? हृदयविकाराची कारणं काय? आतापर्यंत यासंदर्भात अनेक कारणं सांगितली गेली, ती आपल्याला माहीतही आहेत. अर्थातच त्यात चुकीचं काहीच नाही. ही सर्व कारणं बरोबरच आहेत. टेन्शन, धुम्रपानापासून तर आपल्या अयोग्य जीवनशैलीपर्यंत अनेक कारणं हृदयविकाराला कारण ठरू शकतं.पण आता आणखी एक नवं कारण समोर आलं आहे. आपल्या रक्तातील फॉस्फेटचं प्रमाण जर प्रमाणापेक्षा कमी असेल, तरीही तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.फॉस्फेट म्हणजेच एक प्रकारचं खनीज. आपल्या शरीरात खनिजं आवश्यकच असतात आणि त्यांच्या कमतरतेमुळे विविध प्रकारचे आजारही आपल्याला होऊ शकतात, त्यातलाच आणखी एक आजार म्हणजे हृदयविकार.यापूर्वीही शास्त्रज्ञांनी एक चाचणी घेतली होती. ती होती खनिजांचं प्रमाण आपल्या शरीरात जास्त असलं तर काय होतं? अर्थातच हे प्रमाण जास्त असलं तरीही आपल्याला विविध विकारांना सामोरं जावं लागतं. आत्ता संशोधकांनी जी चाचणी घेतली, ती होती शरीरातील खनिजांचं, विशेषत: रक्तातील फॉस्फेटचं प्रमाण कमी झालं तर शरीरावर त्याचा काय दुष्परिणाम होतो याची. शास्त्रज्ञांचा दावा आहे की अशा प्रकारची ही जगातली पहिलीच चाचणी आहे आणि त्यासाठी तब्बल एक लाख पेशंट्सचा पाच ते नऊ वर्षांपर्यंत अभ्यात करण्यात आला.त्यातून हे निरीक्षण समोर आलं आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांचा प्रत्येकाला सल्ला आहे की आपल्या शरीरातील खनिजांचं प्रमाण प्रत्येकानं योग्य तेवढंच; म्हणजे कमीही नाही आणि जास्तही नाही.. असंच राखलं पाहिजे.