शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

जेवण स्वादिष्ट बनवण्यासोबतच शरीरासाठीही गुणकारी असतो तेजपत्ता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 11:07 IST

मसाल्याच्या पदार्थांमध्ये समाविष्ठ होणाऱ्या तेजपत्त्याचा उपयोग भारतीय व्यंजनांमध्ये सुगंध आणि चवीसाठी करण्यात येतो. तेजपत्त्याचे उत्पादन सिक्किम, हिमालय, मणिपूर आणि अरूणाचल प्रदेश या राज्यांमध्ये घेतलं जातं.

मसाल्याच्या पदार्थांमध्ये समाविष्ठ होणाऱ्या तेजपत्त्याचा उपयोग भारतीय व्यंजनांमध्ये सुगंध आणि चवीसाठी करण्यात येतो. तेजपत्त्याचे उत्पादन सिक्किम, हिमालय, मणिपूर आणि अरूणाचल प्रदेश या राज्यांमध्ये घेतलं जातं. तेजपातच्या झाडाची पानं तोडून ती उन्हामध्ये सुकवण्यात येत असून त्या सुकलेल्या पानांनाच तेजपत्ता म्हणतात. एखाद्या पदार्थामध्ये तेजपत्ता घातल्यास त्याचा सुगंध वाढतोच शिवाय तो पदार्थ स्वादिष्टही होतो. परंतु याशिवाय तेजपत्ता आरोग्यासाठीही फायदेशीर असतो. त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारी 81 पोषक तत्व आढळून येतात. यामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशिअम, कॅल्शिअम, सेलेनिअम, प्रोटीन, व्हिटॅमिन आणि आयर्न यांसारखे अनेक फायदेशीर घटक आढळून येतात. याशिवाय यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुण असतात. तसेच अँटीऑक्सीडेंटही भरपूर प्रमाणात असते. जाणून घेऊयात तेजपत्त्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे...

1. पचनक्रियेसाठी फायदेशीर

तेजपत्ता पचनक्रिया सुधारण्यासाठी फायदेशीर असतो. याचं सेवन केल्यानं अनेक प्रकारचे पचनासंबधीत आजार दूर होतात. जर तुम्हाला बध्दकोष्टाची किंवा अॅसिडिटीची समस्या असेल तर तेजपत्ता तुमच्यासाठी रामबाण उपाय आहे. 

2. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी

मधुमेहावर तेजपत्त्याची पानं गुणकारी ठरतात. हे शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवतात. तसचे हृदयाचं आरोग्य राखण्यासाठीही फायदेशीर ठरतात. त्यामुळे मधुमेहानं ग्रस्त असलेले लोकांनी याचे सेवन करणं फायदेशीर ठरतं. 

3. झोपेच्या समस्या दूर करते

बऱ्याचदा आपली झोप पूर्ण होत नाही अथवा आपल्याला झोपच येत नाही. यावर उपाय म्हणून तेजपत्त्याच्या पानांचा उपाय करावा. तेजपत्त्याच्या पानांच्या तेलाचे काही थेंब पाण्यात टाकून ते पाणी प्यायल्यानं शांत झोप लागते. तसेच खूप झोप येत असल्यास तेजपत्ता पाण्यात भिजत ठेवावा आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यावं. असं केल्यानं डोळ्यांवरची झोप उडते आणि फ्रेश वाटतं. 

4. किडनीच्या समस्या दूर होतात

तेजपत्ता किडनीच्या समस्या दूर करण्यासाठी उपयोगी ठरतो. तेजपत्ता पाण्यात टाकून पाणी उकळा आणि पाणी प्या. तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी तेजपत्त्यामुळे फायदा होतो.

5. डोकदुखीवर गुणकारी

रोजची धावपळ आणि ताण यांमुळे अनेकदा डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवतात. तेजपत्त्याच्या पानांचं तेल डोकेदुखी दूर करण्यासाठी रामबाण उपाय आहे. डोक्यावर या तेलानं मसाज केला तर आराम मिळतो.

6. कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी

तेजपत्त्यामध्ये कॅन्सरपासून शरीराचा बचाव करण्यासाठीचे आवश्यक ते गुणधर्म असतात. यामध्ये कॅफीक अॅसिड, क्वेरसेटिन आणि इयूगिनेल यांसारखे घटक असतात. तेजपत्त्यातील हे घटक कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी फायदेशीर असतात. 

7. हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी मदत

तेजपत्ता हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी मदत करतो. तेजपत्त्याचा आहारात समावेश केल्यानं हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसेच हृदय निरोगी राहते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य