आमिर खानने ‘या’ चित्रपटासाठी ५० किलो वजन केले कमी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2017 14:01 IST
चित्रपटातील भूमिकेसाठी आमिरने मेहनत करुन आपले ५० किलो वजन कमी केले असून त्याचे आता नॉर्मल म्हणजे ७० किलो वजन आहे.
आमिर खानने ‘या’ चित्रपटासाठी ५० किलो वजन केले कमी !
मि. परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी खूप मेहनत घेत असतो. विशेष म्हणजे चित्रपटातील आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी आमिर आपल्या शरीराला पूर्णत: बदलवतो. ‘दंगल’ चित्रपटासाठी तर आमिरने तब्बल १२० किलो वजन वाढविले होते. आमिर सध्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी आमिरने मेहनत करुन आपले ५० किलो वजन कमी केले असून त्याचे आता नॉर्मल म्हणजे ७० किलो वजन आहे. ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ च्या सेटवरचे आमिरचे काही फोटो व्हायरल झाले असून त्यात आमिर सळपातळ दिसत आहे. ट्विटरवर आमिरच्या फॅन्सने त्याचे हे फोटो शेअर केले आहेत. आमिरने फक्त आपले वजनच कमी केले नाही, तर पूर्णत: आपले बॉडी टाइपदेखील बदलला आहे. फोटोंमध्ये त्याचे खांदेही वेगळेच दिसत आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चनदेखील आपणास पाहावयास मिळणार आहेत. Also Read : ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’साठी आमिर खानने तोडला नियम!!