शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या झोपेमुळे ८१ टक्के मुंबईकर निद्रानाशाने ग्रस्त: सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 21:01 IST

असंतुलित झोप यांसारख्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याची धक्कादायक बाब देशातील झोपेसंबंधी माहिती गोळा करण्यासाठी केलेल्या ग्रेट इंडियन स्लीप स्कोअरकार्ड २०१९ मध्ये स्पष्ट झाली आहे.

मुंबई : मुंबईकरांना पुरेशी झोप मिळत नसून त्याचे परिवर्तन निद्रानाश, असंतुलित झोप यांसारख्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याची धक्कादायक बाब देशातील झोपेसंबंधी माहिती गोळा करण्यासाठी केलेल्या ग्रेट इंडियन स्लीप स्कोअरकार्ड २०१९ मध्ये स्पष्ट झाली आहे. पुरेशी झोप मिळत नसल्याचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यासह कामावरदेखील होत आहे. ८१% मुंबईकर निद्रानाशाच्या विकाराने ग्रस्त असून अपु-या झोपेमुळे ७८ टक्के मुंबईकरांना आठवड्यातून १-३ वेळा कामावर झोप येत असल्याचे सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे.सातत्यपूर्ण अपुऱ्या झोपेचे आपले मन आणि शरीरावर परिणाम होतात. आपल्याला सतत थकल्यासारखे वाटते आणि त्याचा त्रास होतो. या सर्वेक्षणातून हीच बाब प्रकर्षाने जाणवते. अपुऱ्या झोपेमुळे ५२ टक्के लोकांना पाठदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आपल्या शरीराच्या रचनेनुसार रात्री १०-१०.३० ही झोपण्याची नियमित वेळ असावी असा सल्ला दिला जातो. सर्वेक्षणातून असे दिसून आले की ३६ टक्के लोक ७ तासांपेक्षा ही कमी झोपतात. तर ९० टक्के लोकांना लोकांना रात्रीत १-२ वेळा जाग येते.मुंबईकरांना रात्रभर जागवणा-या गोष्टींमध्ये स्मार्टफोन्सपासून टीव्हीपर्यंत सातत्याने मनोरंजन करणारी व्यासपीठे जबाबदार आहेत. सुमारे ९० टक्के लोक झोपण्यापूर्वी आपला फोन वापरतात. २४ टक्के प्रतिसादकांनी सांगितले की लॅपटॉपवर किंवा स्मार्टफोनवर काही कार्यक्रम पाहत पाहिल्याने ते जागे राहतात. तर कामाबाबत किंवा पैशांची चिंता सतावत असल्याने झोप न येणा-यांची संख्या २३ टक्के इतकी आहे.सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित गर्ग म्हणाले, झोपेच्या कमतरतेमुळे उच्च रक्तदाबापासून ते चिंता वाढण्यापर्यंत अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. ग्रेट इंडियन स्लीप स्कोअरकार्ड २०१९ मधून आपल्याला याची कल्पना येते की भारतीय लोक कसे या समस्यांकडे अजून दुर्लक्ष करत आहेत. यापेक्षा जास्त चिंतेची बाब ही आहे की, त्यापैकी बहुतांशी लोक झोपेसंबंधीच्या विकारांना खरी समस्या मानतच नाहीत. आम्ही भारतीयांचे एकंदर निद्रा-स्वास्थ्य सुधारण्यासाठी निरंतर प्रयत्न करत आहोतच पण याबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे.