शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

दात दुखल्यास ७० टक्के रुग्ण करतात रुट कॅनल: दात काढा म्हणणारे २० टक्के

By शीतलकुमार कांबळे | Updated: March 6, 2023 13:44 IST

राष्ट्रीय दंतवैद्यक दिवस: औषधावर भागविणाऱ्यांची संख्या मोठी

शीतलकुमार कांबळे

सोलापूर : माणसाचे व्यक्तिमत्व अधिक सुंदर दिसण्यासाठी त्याचे दाताच्या सुंदर असणे अधिक गरजेचे असते. पण, एखाद्याचा दात दुखू लागला तर त्याचा त्रास हा सहन करण्यापलीकडे असतो. त्यामुळे दंतवैद्याकडे जाण्याची गरज पडते. दंत वैद्यकाकडे गेल्यानंतर एकूण ७० टक्के रुट कॅनल करण्याला प्राधान्य देतात.दातांना कीड लागणं हा तोंडामधील जीवाणुंमुळे होणारा आजार आहे. दातांना कीड लागल्यामुळे तिथे छिद्र पडतात. या छिद्रामध्ये अन्नकण अडकतात. दातांचा पृष्ठभाग पोखरला जातो आणि मग दाताला मोठा खड्डा पडतो. त्यालाच कॅव्हिटी म्हणतात. ही कॅव्हिटी आकाराने लहान असतानाच ती दंत चिकित्सकाकडून भरून घेणे चांगले असते.

रुट कॅनल म्हणजे ?या उपचारात दात व दाढेच्या किडलेल्या भागातून मुळामध्ये असलेल्या रूट कॅनलपर्यंत जाऊन जंतुसंसर्ग झालेला भाग साफ केला जातो. तिथली पोकळी निर्जंतुक केली जाते. जंतुसंसर्ग झालेला पल्पचा भाग काढून टाकताना मधूनमधून दातात जंतुनाशक औषधांचा फवारा केला जातो. रूट कॅनलच्या निर्जन्तुक झालेल्या पोकळीत औषधी कोन भरले जातात व त्या पोकळीचे फिलिंग केले जाते. या संपूर्ण प्रक्रियेला रूट कॅनल म्हणतात.दात दुखल्यास रुग्ण काय करतात ?रुट कॅनल - ७० टक्केदात काढणे - २० टक्केफक्त तात्पुरते औषध घेणे - १० टक्के

कोणत्या प्रकारचे कॅप प्राधान्याने लावतातसिरॅमीक कॅप - ७० टक्केधातूची कॅप - २५ टक्केझिलकोनिया कॅप - ५टक्के

दात किडल्याचे माहिती झाल्यानंतर लगेच उपचार घेणे गरजेचे असते. अनेकदा रुग्ण हे डॉक्टरांकडे उशीरा येतात. त्यामुळे आजार तर वाढतोच सोबत उपचाराचा खर्च आणी त्रासही वाढतो. दात दुखत असल्यास औषध दुकानातून स्वताहून औषध घेणे धोक्याचे ठरते. दर सहा महिन्याला दातांची तपासणी करुन घेतल्यास आजार आणखी वाढत नाही.- डॉ. किरण किणीकर, दंतरोग तज्ज्ञ

टॅग्स :Dental Care Tipsदातांची काळजी