स्वाईन फ्लूचे २३ बळी
By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST
स्वाईन फ्लूचे २३ बळी
स्वाईन फ्लूचे २३ बळी
स्वाईन फ्लूचे २३ बळी- पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९६ : मेडिकलमध्ये ३० रुग्णांवर उपचारनागपूर : उपराजधानीत स्वाईन फ्लू चर्चेचा व चिंतेचा विषय बनला आहे. रविवारी स्वाईन फ्लू संशयित म्हणून मृत झालेला रुग्ण आज मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे, तर एका खासगी इस्पितळात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लू बळीची संख्या २३ झाली आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९६ झाली आहे. चैनसुख शाहू (४०) रा. छिंदवाडा व प्रवीण जैन (५३) रा. स्वामी कॉलनी, आकारनगर असे मृताची नावे आहेत.उपराजधानीत स्वाईन फ्लूची दहशत कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. रविवारी स्वाईन फ्लू संशयित असलेला चैनसुख शाहू यांचा मृत्यू झाला. मंगळवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शुक्रवारी प्रवीण जैन यांना वोक्हार्ट इस्पितळात भरती करण्यात आले होते. शनिवारी त्यांना स्वाईन फ्लू असल्याचे निष्पन्न झाले. उपचारादरम्यान मंगळवारी दुपारी १.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. बॉक्स..-पॉझिटिव्ह व संशयित रुग्ण एकाच वॉर्डातस्वाईन फ्लूचे २२ तर ८ संशयित असे ३० रुग्ण मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात एकत्र उपचार घेत आहेत. या पद्धतीमुळे संशयित रुग्णही पॉझिटिव्ह येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे, सोमवारी पाच वर्षांखालील दोन मुलेही याच वॉर्डात भरती आहेत. पुरुष, महिला आणि लहान मुलांवर एकाच ठिकाणी उपचार होत असल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.बॉक्स...-मेडिकलच्या डॉक्टरांचे आरोग्य धोक्यातसार्वजनिक आरोग्य विभाग आणि महापालिकेने रुग्ण तपासणीला घेऊन हात वर केले आहे. परिणामी मेडिकलवरच स्वाईन फ्लू रुग्णांची जबाबदारी येऊन पडली आहे. परंतु सोयी पुरविण्यात प्रशासन गंभीर नसल्याने आता मेडिकलच्या डॉक्टरांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. दीड महिना उलटूनही येथील डॉक्टरांना स्वाईन फ्लूची लस (व्हॅक्सीनेशन) देण्यात आलेली नाही. रुग्ण तपासणीसाठी आवश्यक असलेले स्पेशल गाऊन्स, गॉगल्स देण्यात आले नाही. इतर रुग्णांसोबतच स्वाईन फ्लू रुग्णांचाही भार वाढल्याने आरोग्यावर परिणाम पडत असल्याचे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे.