शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

आव्हाणे येथे १९ जणांना अतिसाराची लागण चार बालक जिल्हा रुग्णालयात : गंभीर बालिकेला औरंगाबादला, जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांची भेट

By admin | Updated: June 7, 2016 07:41 IST

जळगाव : तालुक्यातील आव्हाणे येथे दूषित पाण्यामुळे १९ जणांना अतिसाराची लागण झाली असून त्यांच्या रुग्णांवर जळगाव येथे उपचार आहे. यातील ९ महिन्याची बालिका गंभीर असून तिला औरंगाबादला हलविण्यात आले आहे. घटनेची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाचे पथक रवाना झाले असून गावात २५ ते ३० रुग्णांवर उपचार सुरू आहे.

जळगाव : तालुक्यातील आव्हाणे येथे दूषित पाण्यामुळे १९ जणांना अतिसाराची लागण झाली असून त्यांच्या रुग्णांवर जळगाव येथे उपचार आहे. यातील ९ महिन्याची बालिका गंभीर असून तिला औरंगाबादला हलविण्यात आले आहे. घटनेची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाचे पथक रवाना झाले असून गावात २५ ते ३० रुग्णांवर उपचार सुरू आहे.
दरम्यान, १० ते १५ वर्षांपूर्वी या प्रकारची घटना घडली होती. पाईनलाईन गळती तसेच पाणी पुरवठा करणारी टाकी स्वच्छ होत नसल्याने या घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
दोन दिवसांपासून गावातील अनेकांना अतिसाराचा त्रास जाणवू लागला. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर अतिसाराची लक्षणे आढळून आली. गटारींमधून पाईपलाईन गेली असून तिला अनेक ठिकाणी गळती आहे. तसेच पाण्याची टाकी स्वच्छ होत नसल्याने अस्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याने हा प्रकार उद्भवल्याची माहिती मिळाली आहे.

यांना झाली लागण...
गावातील १९ जणांना अतिसाराची बाधा झाली आहे. त्यात चार बालकांचा समावेश आहे. तसबिया शेख अहमद (१०), आसीफ इम्रान खाटीक (१२), अरबाज इम्रान खाटीक (१०), मायरा इरफान पिंजारी (४), उमेरा इरफान पिंजारी (२), असनेद सिद्दीक खान (१५ महिने), मोईन खान सिद्दीकी (४), इम्तियाज अब्दुल पिंजारी (६०), कैलास उत्तम भील (४०), सुमनबाई रघुनाथ सुरवाडे (६५) आदींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
नऊ महिन्यांची बालिका गंभीर
माहिल इरफान पिंजारी (९ महिने) या चिमुरडीला सकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर नातेवाईकांनी तिला खाजगी रुग्णालयात नेले. मात्र तेथेही गंभीर झाल्याने पुन्हा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.के.शेळके यांनी १०८ रुग्णवाहिका त्यांना उपलब्ध करून दिली व औरंगाबादला रवाना केले. तिचे आजोबा अब्दुल पिंजारी यांनादेखील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गावातील १९ नागरिकांना अतिसाराची लागण झाली आहे. त्यापैकी ६ जणांवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे तर इतर सहा जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. गावातही ७ नागरिकांवर उपचार सुरू आहे. जिल्हा आरोग्य विभागाचे तसेच कानळदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक आव्हाण्याला पाठवले आहे. पाण्याचे पाच नमुने तपासणीसाठी घेतले असून जिल्हा प्रयोगशाळेत त्याची तपासणी करण्यात येईल.
-डॉ. शामसुंदर निमगडे, जिल्हा आरोग्य अधिकारी