शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दंत महाविद्यालयाच्या बीडीएसच्या १७ जागा रिक्त

By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST

दंत महाविद्यालयाच्या बीडीएसच्या १७ जागा रिक्त

दंत महाविद्यालयाच्या बीडीएसच्या १७ जागा रिक्त
-मागील तीन वर्षांपासून हीच स्थिती : प्रवेश प्रक्रियेच्या घोळामुळे विद्यार्थ्यांना फटका

नागपूर : वैद्यकीय प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षेतून (एनईटी) महाराष्ट्र बाहेर पडेल आणि यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना अतिरिक्त जागा उपलब्ध होतील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेत दिली. परंतु अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या पूर्ण जागाच भरल्या जात नसल्याची धक्कादायक माहिती आहे. विशेष म्हणजे, नागपूर शासकीय दंत महाविद्यालयात या वर्षी ५० जागांसाठी फक्त ३३ जागाच भरण्यात आल्या आहेत. हीच स्थिती मागील तीन वर्षांपासून आहे.
दंत महाविद्यालयाच्या बीडीएस (बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी) विषयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आणि जागा कमी राहत असल्याने २०१३ मध्ये भारतीय दंत परिषदेने (डीसीआय) वाढीव दहा जागेला मंजुरी दिली. ४० वरून या जागा ५० झाल्या. या जागा भरण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन शासकीय दंत महाविद्यालय जून महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होते. मात्र, सेंट्रल ॲडमिशनच्या प्रवेश प्रक्रियेत बराच वेळ जातो. साधारण दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागतो. याचा परिणाम राज्याच्या प्रवेशप्रक्रियाच्या राऊंडवर पडून त्यात बराच विलंब होतो. दुसरीकडे याच काळात खासगी दंत महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली असते. अनेक विद्यार्थी शासकीय महाविद्यालयात नंबर लागणार नाही या शंकेने खासगी महाविद्यालयात भरमसाट पैसे भरुन प्रवेश निश्चित करतात. शेवटच्या घटकेला जेव्हा शासकीय महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त आहे अशी माहिती मिळाल्यावर त्यांना वेळेवर जमा केलेले पैसे किंवा डाक्युमेंट मिळत नाही. यातच सुप्रीम कोर्टाने ३० सप्टेंबर शेवटची तारीख ठरवून दिल्याने या तारखेपर्यंत दंत महाविद्यालयाच्या पूर्ण जागाच भरल्याच जात नाही. मागील दोन वर्षांपासून हीच स्थिती असल्याने याचा फटका विशेषत: गरीब विद्यार्थ्यांना बसत आहे.