शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उपचारादरम्यान १० महिन्याच्या बालकाचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप : गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा

By admin | Updated: December 3, 2015 00:35 IST

जळगाव : दिवाळीसाठी मामाच्या घरी आलेल्या विवाहितेच्या १० महिन्यांच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवारी अग्रवाल हॉस्पिटलमध्ये घडली. डॉक्टारांच्या हलगर्जीपणामुळेच बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून डॉक्टरांनी मात्र इन्कार केला आहे. श्वास गुदमरल्यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकरणी जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा नातेवाईकांनी घेतल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

जळगाव : दिवाळीसाठी मामाच्या घरी आलेल्या विवाहितेच्या १० महिन्यांच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवारी अग्रवाल हॉस्पिटलमध्ये घडली. डॉक्टारांच्या हलगर्जीपणामुळेच बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून डॉक्टरांनी मात्र इन्कार केला आहे. श्वास गुदमरल्यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकरणी जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा नातेवाईकांनी घेतल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी मगन गोमाभाऊ भोई, रा. जिजाऊनगर यांनी आपली भाची मंगला अशोक भोई (रा. विटा, जि. पुणे) हिला दिवाळीसाठी आपल्या घरी आणले होते. तिचा मुलगा प्रवीण (१० महिने) या बालकास सर्दी झाल्याने त्याला बुधवारी दुपारी १२ वाजता डॉ. विश्वेश अग्रवाल यांच्या अग्रवाल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर उपचार सुरू असताना दुपारी दोन वाजता या बालकाचा मृत्यू झाला.
हलगर्जीपणाचा आरोप
मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांना धक्का बसला असून याबाबत त्यांनी सांगितले की, मुलाला केवळ सर्दी असल्याने त्याला उपचारासाठी येथे आणले होते. डॉक्टरांनी मात्र त्याला दाखल करावे लागेल असे सांगून दोन हजार रुपये आगाऊ (ॲडव्हान्स) घेऊन बालकाला दाखल करून घेतले. उपचारादरम्यान बालकाला औषध दिले व त्याला उलटी होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाला. हे उपचार करताना डॉक्टरांनी हलगर्जीपणा करीत चुकीचे उपचार केल्याने तसेच येथील नर्सेस स्टाफच्याही दुर्लक्षामुळे या बालकाचा मृत्यू झाला, असा आरोप मगन भोई यांनी केला आहे.
गुन्हा दाखल करा, मगच मृतदेह ताब्यात घेऊ
या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा नातेवाईकांनी घेतला होता. त्यामुळे रुग्णालयात काहीसे तणावाचे वातावरण होते.
पोलिसांकडून चौकशी
रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर रामानंद नगर पोलिसांनी रुग्णालयात येऊन डॉक्टरांची चौकशी केली.
शवविच्छेदनानंतर होणार कारण स्पष्ट
या बालकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल, असे डॉक्टरांचे म्हणणे असून त्यासाठी शवविच्छेदन आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते.