शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. विषय समिती सभापतिपदासाठी अपक्ष सदस्यांमध्ये होणार टॉस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2022 05:00 IST

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक १० मे रोजी पार पडली. त्यानंतर जि.प.च्या पाच विषयी समिती सभापतिपदासाठी सोमवारी (दि.२३) रोजी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस, चाबी आणि दोन अपक्ष सदस्यांना सोबत ४० सदस्यांचा आकडा गाठत सत्ता स्थापन केली. यात अध्यक्षपद भाजपकडे, तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : युतीचा त्रिकोण करून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केलेल्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष सदस्यांमध्ये आता विषयी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीवरून चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. दोन अपक्ष सदस्यांना प्रत्येकी अडीच अडीच  वर्षं सभापतिपद वाटून दिले जाणार आहे. यासाठी आधी सभापतिपदी कोण विराजमान होणार? यासाठी या दोन्ही सदस्यांना आपसांत टॉस करावा लागणार असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक १० मे रोजी पार पडली. त्यानंतर जि.प.च्या पाच विषयी समिती सभापतिपदासाठी सोमवारी (दि.२३) रोजी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस, चाबी आणि दोन अपक्ष सदस्यांना सोबत ४० सदस्यांचा आकडा गाठत सत्ता स्थापन केली. यात अध्यक्षपद भाजपकडे, तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला दिले. त्यानंतर आता पाच विषय समिती सभापतिपदांसाठी सोमवारी निवडणूक होत आहे. यात भाजप अर्थ व बांधकाम आणि आरोग्य व शिक्षण हे दोन्ही महत्त्वपूर्ण विभाग स्वत:कडे ठेवूून घेणार आहे. तर अपक्ष सदस्यांना एक आणि चाबी संघटनेला एक सभापतिपद दिले जाणार आहे. समाजकल्याण, महिला व बालकल्याण आणि कृषी व पशुसंवर्धन यापैकी कोणते सभापतिपद नेमके कुणाला द्यायचे, सभापतिपदी कोणत्या सदस्यांची वर्णी लावायची हे अद्यापही निश्चित झालेले नाही. याचा निर्णय रविवारी रात्री होणार असल्याची माहिती आहे. पण दोन अपक्ष सदस्यांना सभापती मिळणार हे निश्चित आहे. त्यांना प्रत्येकी अडीच अडीच वर्षांचा कालावधी मिळणार आहे. पण यासाठी त्यांना आधी सभापती कोण विराजमान होणार, याचा निर्णय आपसांत ठरवून घ्यावा लागणार असल्याची माहिती  भाजपच्या सूत्रांनी दिली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसला उपाध्यक्षपदावर समाधान मानावे लागणार असून, त्यांच्या वाट्याला कृषी व पशुसंवर्धन विभाग येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

नाराजी टाळण्यासाठी तासभर आधी नावे - विषय समिती सभापतिपदाची निवडणूक सोमवारी होत आहे. या निवडणुकीत सभापतिपदी नेमकी कुणाची वर्णी लावायची हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी निश्चित केले आहे. पण, त्यांची नावे आत्ताच जाहीर न करता निवडणुकीच्या तासभरापूर्वी जाहीर करायची, अशी भूमिका घेतली आहे. हा सर्व खटाटोप केवळ सदस्यांमध्ये ऐनवेळी फूट पडू नये यासाठीच असल्याची माहिती आहे. 

चाबी कुणाला देणार संधी - भाजपसह जिल्हा परिषदेत सत्तेत सहभागी असलेल्या चाबी संघटनेला एक सभापतिपद मिळणार, हे निश्चित आहे. मात्र, यासाठी चाबी गोंदिया विधानसभा क्षेत्रातील चारपैकी कोणत्या एका सदस्याला संधी देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

काँग्रेस पार पडणार विरोधकाची भूमिका - जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करताना भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष आणि चाबी संघटना असे ४० सदस्य एकत्र आले. त्यामुळे सभागृहात काँग्रेसचे १३ सदस्य विरोधी बाकावर बसणार असून ते विरोधकांची भूमिका पार पाडणार आहे. 

जि.प.आड विधान परिषदेची तयारी- भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून पुढील वर्षी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीचे समीकरण जुळविण्यास सुरुवात केली आहे. यासाठी काहीही झाले तरी अपक्ष सदस्यांना सोबत घेऊन चालायचे अशी भूमिका घेतली आहे. त्यासाठी चाबी संघटना आणि दोन अपक्ष सदस्यांना सभापती देण्याचा फाॅर्म्यूला एका आमदाराने तयार केला असल्याची माहिती आहे. 

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद