शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. शिक्षकांना मिळणार १ तारखेला वेतन

By admin | Updated: August 17, 2015 01:43 IST

शिक्षकांच्या समस्या व प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्या कक्षात आ. नागो गाणार यांच्या उपस्थितीत सहविचार सभा गुरूवार पार पडली.

नागो गाणार : आदेशाचे पालन न करणाऱ्या मुख्याध्यापकांची मान्यता रद्द होणारगोंदिया : शिक्षकांच्या समस्या व प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्या कक्षात आ. नागो गाणार यांच्या उपस्थितीत सहविचार सभा गुरूवार पार पडली. यात जि.प. शाळांतील शिक्षकांच्या वेतनाबाबत चर्चा झाली. त्यावेळी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पाटील यांनी सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना यापुढे दरमहा १ तारखेला वेतन देण्याचे मान्य केले.सदर सहविचार सभेत सर्वप्रथम वेतनवाढ, दुय्यम सेवा पुस्तक, घरभाडे भत्ता, मासिक पे स्लिप आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत वेतनवाढ, दुय्यम सेवा पुस्तक, घरभाडे भत्ता न देणाऱ्या व शिक्षणाधिकारी यांचे आदेश वेळोवेळी पालन न करणाऱ्या मुख्याध्यापकांची सुनावणी आयोजित करण्यात आली. तसेच त्यांची मान्यता रद्द करण्याची कार्यवाही करण्याचे ठरविण्यात आले. तर एका शाळेच्या मुख्याध्यापकाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय सभेतच घेण्यात आला. वेतनाबाबत झालेल्या चर्चेत शिक्षणाधिकाऱ्यांनी महिन्याच्या एक तारखेला वेतन देण्याचे मान्य केले. सोबतच जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या इतर प्रश्नांवरही चर्चा होऊन सकारात्मक निर्णय घेण्यात आले. सभेला शिक्षणाधिकारी खंडागळे, पाटील, उपशिक्षणाधिकारी मोहबंशी, वरिष्ठ लेखा परीक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शिक्षक परिषदेचे पदाधिकारी नीताराम अंबुले, सतीश मंत्री, लीलेश्वर बोरकर, राधेश्याम पंचबुद्धे, सनत मुरकुटे, चरणदास डहारे, गुणेश्वर फुंडे, कृष्णा देशमुख, सी.एस. बिसने, ईश्वर टेंभरे, भागवत बडोले, मनोज डोंगरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)शिक्षकांच्या अनेक समस्या कायमच आॅनलाईन वेतन प्रणालीमुळे दर महिन्याच्या १ तारखेला सर्व शिक्षकांचे वेतन होतील, असे सर्वच शिक्षकांना वाटत होते. मात्र ही आॅनलाईन वेतन प्रणालीच त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरली होती. एक तारीख तर सोडाच महिन्याचे १० दिवस लोटूनही शिक्षकांना वेतन होत नव्हते. त्यामुळे वेतन वेळेवर न होणे ही त्यांची प्रमुख समस्या होती. आता वेतनवाढ, दुय्यम सेवा पुस्तक, घरभाडे भत्ता, मासिक पे स्लिप आदींच्याही समस्या कायमच होत्या. या सर्व प्रकाराबाबत आ. नागो गाणार यांच्या उपस्थितीत दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या समोर शिक्षक परिषदेने चर्चा घडवून आणली. १९१ शिक्षकांची वेतनवाढ पूर्ववत गोरेगाव : तालुक्यातील १९१ शिक्षकांनी २००९-१० या वर्षात प्रवास रजा सवलत घेतली होती. पण यावर पीआरसीने आक्षेप नोंदविल्याने त्या १९१ शिक्षकांवर कारवाई करत त्यांची एका वर्षासाठी वेतनवाढ थांबविली होती. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने वेतनवाढ पूर्ववत करण्याबाबत वेळोवेळी संबंधित विभागाशी चर्चा करून मागणी करण्यात आली होती. यावर शुक्रवारी जि.प. गोंदियाने त्या १९१ शिक्षकांची वेतनवाढ पूर्ववत करण्याचे पंचायत समितीला आदेश दिले. सदर प्रकरणात शिक्षक संघाच्या वतीने खंडविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे व गटशिक्षणाधिकारी यशवंत कावळे यांच्यासोबत चर्चा करून वेतनवाढ त्वरित करण्याची मागणी करण्यात आली होती. शिष्टमंडळात केंद्रप्रमुख जी.जे. बिसेन, तालुका संयोजक शंकर चव्हाण, ए.डी. पठाण, एफ.एम. बिसेन, पी.आय. गौंधर्य, वाय.बी. पटले, पोमेश येळे, चैतराम कायलारे, एन.के. बिसेन, डब्ल्यू.एच. रहांगडाले, व्ही.आर. रहांगडाले, पी.झेड. पटले, अंगद कुंडगीर, एफ.जे. प् ाठाण, राहुल कळंबे, रमेश बिसेन, डी.डी. बिसेन उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)