शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

धान वाचविण्यासाठी जि.प. पदाधिकारी सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2016 00:12 IST

पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी असलेले धानपिक करपण्याच्या मार्गावर आहे. अनेक ठिकाणी रोवणी खोळंबली असून पाण्याची नितांत गरज आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : सिंचन प्रकल्पाचे पाणी सोडाभंडारा : पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी असलेले धानपिक करपण्याच्या मार्गावर आहे. अनेक ठिकाणी रोवणी खोळंबली असून पाण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे टेकेपार व करचखेडा उपसा सिंचन योजनेतील पाणी सोडून धानपिक वाचवावे, अशी आर्त जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याना निवेदन दिले आहे.भंडारा जिल्हा तसेच करचखेडा व टेकेपार उपसा सिंचन योजनेतील लाभ क्षेत्रातील मागील काही दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. निसर्गराजा कोपल्याने शेतकऱ्यांचे शेतातील धानपिके हातून जाण्याच्या मार्गावर आहे. या पिकांना पाण्याची गरज आहे. पाण्याअभावी शेतातील उभी पिके करपू लागली असून अनेक ठिकाणची रोवणी अडकलेली आहे. पावसाअभावी धान लागवड यावर्षी शक्य वाटत नसल्याने शेतकरी पुन्हा एकदा कर्जाच्या बोझ्याखाली दबण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दुष्काळामुळे शेतकरी नैराश्येत जावून विपरीत कृती करण्याची भिती व्यक्त होत आहे. करीता जिल्ह्यातील बंद असलेल्या टेकेपार व करचखेडा उपसा सिंचन योजना तात्काळ सुरू करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदनातून केली आहे. यावेळी सुनिल पडोळे उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य उत्तम कळपाते, ज्योती खवास, ईश्वर कळंबे, नरेश येवले, मनिषा वाघमारे, नाना बडगे, ताराचंद भुरे, सखाराम कारेमोरे, गजानन कळंबे, संजय अहिरकर आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)