शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. समाजकल्याण अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 20:48 IST

‘माहितीचा अधिकार’ कायद्यान्वये अर्जदाराला माहिती उपलब्ध करून न देणे तसेच महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठ नागपूर येथे सुनावणीस उपस्थित न राहणे या बाबी माहितीच्या कायद्याच्या उद्दिष्टास मारक ठरणाऱ्या आहेत.

ठळक मुद्दे१० हजार रूपयांचा दंड : राज्य माहिती आयोग खंडपीठ नागपूरचा निर्णय

आॅनलाईन लोकमतगोंदिया : ‘माहितीचा अधिकार’ कायद्यान्वये अर्जदाराला माहिती उपलब्ध करून न देणे तसेच महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठ नागपूर येथे सुनावणीस उपस्थित न राहणे या बाबी माहितीच्या कायद्याच्या उद्दिष्टास मारक ठरणाऱ्या आहेत. त्यामुळे राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाने एका सुनावणीत, प्रथम अपिलिय अधिकारी तथा जिल्हा समाजकल्याण कार्यालय, जि.प. गोंदिया यांना १० हजारांचा दंड आणि शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस केली आहे.तिरोडा तालुक्याच्या पांजरा येथील महेंद्र नंदागवळी हे जनसेवा जयलक्ष भ्रष्टाचार निराकरण समितीचे संघटक आहेत. त्यांच्या अर्जावर संबंधित जनमाहिती अधिकाऱ्याने कसलीही कार्यवाही केली नाही. त्यांनी तक्रार केली. याची सुनावणी ४ आॅक्टोबर २०१६ रोजी सुनावणी झाली. त्यात दिलेल्या आदेशानुसार संबंधित जनमाहिती अधिकाऱ्याने कार्यवाही न केल्याने नंदागवळी यांनी आयोगाकडे पुन्हा तक्रार केली. याची सुनावणी १२ जुलै २०१७ रोजी झाली. त्यावेळी तक्रारकर्ते नंदागवळी हजर होते. मात्र जनमाहिती अधिकारी तसेच प्रथम अपिलिय अधिकारी हे काहीही न कळविता गैरहजर होते. त्यामुळे उपलब्ध कागदपत्रे व झालेल्या युक्तिवादावरून माहिती आयोगाने निर्णय दिला. त्यात जनमाहिती अधिकाºयाने अद्यापही माहिती उपलब्ध करून दिली नाही. आयोगाने आदेश देवूनही सदर अधिकाºयाने आदेशाचे पालन केले नाही. जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलिय अधिकारी हे द्वितीय अपिल सुनावणीस व नंतरच्या सुनावणीस गैरहजर असल्याने त्यांनी आयोगाच्या आदेशाची दखल घेतली नसल्याचे स्पष्ट होते. शिवाय या प्रकरणात त्यांनी दुर्लक्ष करित बेजबाबदारपणा दाखविला आहे. त्यामुळे अर्जदाराला माहिती मिळविण्यासाठी वारंवार हेलपाट्या घालाव्या लागल्या. त्यामुळे तक्रारकर्ता नुकसान भरपाईस पात्र ठरतो. त्यामुळे समाजकल्याण कार्यालय जि.प.गोंदिया यांनी कलम १९ (८) (ख) अन्वये ५ हजार रूपये नुकसानभरपाई तक्रारकर्त्यास धनादेशाद्वारे देवून त्याची पोच अविलंब आयोगास पाठवावी, असे आदेश दिले. तसेच सदर प्रकरणात जनमाहिती अधिकारी यांनी विहीत मुदतीत माहिती न दिल्याने व प्रथम अपिलिय अधिकारी यांनी सुनावणी न घेतल्यामुळे त्यांच्याकडून कलम ७ (१) व कलम १९ (६) चा भंग झाला आहे. त्याबाबत त्यांना खुलासा मागविण्यात आला होता. परंतु त्यांनी खुलासा दिला नाही. सदर प्रकरणात कोणतीही कार्यवाही केली नाही व सुनावणीदरम्यानही अनुपस्थित राहिले. त्यामुळे अपिलकर्त्याने माहिती मिळविण्यासाठी केलेली विनंती त्यांनी हेतुपुरस्पर नाकारल्याचे सिद्ध होते. त्यामुळे सदर अधिनियमाच्या कलम १९ (६) चा भंग झाला आहे. त्यामुळे कलम २० (२) व कलम १९ (८) नुसार शिस्तभंगाची शिफारस व माहिती आयोगाच्या आदेशाची अवहेलना झाल्यामुळे माहिती अधिकार अधिनियम २००५ मधील कलम २० (१) व कलम १९ (८) (ग) अन्वये संबंधित जि.प. समाजकल्याण अधिकाऱ्यांवर १० हजार रूपयांचा दंड आकारला. दंडाची रक्कम त्यांच्या वेतनातून सोयीनुसार हप्ते पाडून रक्कम जमा करावी व वसूल केलेल्या रकमेच्या चालानाच्या प्रती आयोगास सादर करावे, असे आदेश जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जि.प. गोंदियाला दिले आहे.