शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

महिला मेळावा उत्साहात

By admin | Updated: March 31, 2016 02:13 IST

एकात्मिक बाल विकास प्रकल्प देवरी अंतर्गत फुटाणा बिटामार्फत आटलीटोला (सिरपूरबांध) येथील आंगणवाडीच्या पटांगणावर महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

विविध स्पर्धा : बक्षीस वितरणाने समारोपशिरपूरबांध : एकात्मिक बाल विकास प्रकल्प देवरी अंतर्गत फुटाणा बिटामार्फत आटलीटोला (सिरपूरबांध) येथील आंगणवाडीच्या पटांगणावर महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य उषा शहारे, उद्घाटक म्हणून सभापती पं.स. देवरी देवकी मरई उपस्थित होत्या. अतिथी म्हणून सरपंच नहरसिंग फंडकी, प्रमुख पाहुणे म्हणून सविता पुराम, दुर्योधन शिवणकर, गजानन शिवणकर, विष्णू सरोटे, अनुकला कोडापे, शामकला बारसे, कविता ताराम, लिला मेश्राम, वाय.बी.कटरे, गभणे, नामदेव कोसरकर, हिरामन ढोरे, जसवंता शिवणकर, प्रमोद ब्राम्हणकर, नरेश शिवणकर, कला सरोटे उपस्थित होते. सर्वप्रथम अंगणवाडी केंद्रात लावण्यात आलेल्या प्रदर्शनीचीे फित कापून प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. नंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, जिजामाता यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. प्रास्ताविक बालविकास प्रकल्प अधिकारी नवथडे यांनी केले. प्रास्ताविकेत त्यांनी शासनातर्फे चालविण्यात योजनाची सविस्तर माहिती दिली. त्या योजनांचा लाभ कोणाला आणि कसा घेता येईल असे मार्मिक शब्दात समजावून सांगितले. त्याच प्रमाणे पाहुण्यांनी सुध्दा उपस्थित महिला, तरूणी व गर्भवती मातांनी शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती करूण दिली. अध्यक्षीय भाषणात उषा शहारे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या सर्व बिटातील अंगणवाडी सेविकांचे कौतुक केले. गावपातळीवर महिलांना एकत्रित आणल्या शिवाय त्याचा समाजात विकास अशक्य असल्याचे सांगितले. याप्रसंगी संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा, पाककृती, हस्तकला, व्यंजनात्मक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत करणाऱ्या मुलांना प्रोत्साहन म्हणून पारितोषीक देण्यात आले. हस्तकला स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषीक शोफीया शेख, मसरूम शेती करीता गुंजन महिला बचत गट, रांगोळी स्पर्धेत, आंगणवाडीत जाणारा मुलगा या रांगोळी प्रथम क्रमांक देण्यात आला. आहार प्रदर्शनीमध्ये प्रथम- सरस्वती ब गट यांनी मिळाला. व स्पर्धेत प्रदर्शनीमध्ये भाग घेणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून बक्षीस देण्यात आले. मेळाव्यात फुटाना बिटातील अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच गावातील महिला बचतगट महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.(वार्ताहर)