शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

झेडपीच्या विद्यार्थिनीनी पाहिला ‘पॅडमॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:13 IST

समाजात मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जनजागृती व त्याबद्दल असलेले गैरसमज दूर करण्यासाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील साडेतीन हजार किशोरवयीन विद्यार्थिनीना ‘पॅडमॅन’ हा चित्रपट जिल्ह्यातील ......

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा उपक्रम : चित्रपटातून जनजागृती

ऑनलाईन लोकमतगोंदिया : समाजात मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जनजागृती व त्याबद्दल असलेले गैरसमज दूर करण्यासाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील साडेतीन हजार किशोरवयीन विद्यार्थिनीना ‘पॅडमॅन’ हा चित्रपट जिल्ह्यातील विविध चित्रपट गृहांमध्ये दाखविण्यात येणार आहे. आमगाव येथून या उपक्रमाला शुक्रवारी (दि.३०) सकाळी ९ वाजता सुरूवात करण्यात आली.मासिक पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे. मात्र ग्रामीण भागात याविषयी अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे महिला व मुलींची बरेचदा कुचंबना होते. शिवाय आरोग्यविषयक अज्ञानामुळे, स्वच्छतेचा संदेश योग्यवेळी न पोहोचल्याने अनेक युवतींना विविध आजारांना सामोरे जावे लागते. मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जनजागृती करून महिला व मुलींची कुचंबना थांबविता यावी. यासाठी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), शिक्षण विभाग आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना पॅडमॅन चित्रपट दाखविण्यात येत आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाने ग्रामीण भागातील महिलांसाठी तसेच जिल्हा परिषद शाळेतील ११ ते १९ वर्षे वयोगटातील मुलींसाठी माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यासाठी ८ मार्च २०१८ पासून ‘अस्मिता’ योजनेला सुरूवात केली आहे. विद्यार्थिनीना पॅडमॅन चित्रपट दाखविण्यामागे मासिक पाळी व्यवस्थापन, सॅनिटरी नॅपकिन वापरण्याबाबत जनजागृती होईल हा या मागील शासनाचा उद्देश आहे. दरम्यान जिल्ह्यातील ११३ जिल्हा परिषदेच्या शाळांतील सुमारे तीन हजार ३८२ विद्यार्थिनींना पॅडमॅन हा चित्रपट दाखविण्यात आला.आमगाव येथील चित्रपटगृहात आमगाव, सालेकसा व देवरी तालुक्यातील ३४ शाळांतील ८१० विद्यार्थिनींना ३० व ३१ मार्च रोजी सकाळी ९ ते १२ दरम्यान चित्रपट पाहता येणार आहे. तिरोडा येथील चित्रपटगृहात तालुक्यातील १७ शाळांतील ७९० विद्यार्थिनींना ३१ मार्च, तसेच १ व २ एप्रिल रोजी सकाळी ९ ते १२ च्या दरम्यान चित्रपट पाहता येणार आहे.तर गोंदिया येथील चित्रपट गृहात ६ ते ९ एप्रिलदरम्यान सकाळी ९ ते १२ या वेळात गोंदिया, अर्जुनी-मोरगाव, गोरेगाव व सडक-अर्जुनी तालुक्यातील सुमारे ६२ शाळांतील १७८२ विद्यार्थिनींना चित्रपट दाखविण्यात येणार आहे.विद्यार्थिनीनीसाठी वाहनाची सोयविद्यार्थिनीना ये-जा करण्यासाठी परिवहनाच्या व्यवस्थेसह विद्यार्थ्यांसोबत एका महिला शिक्षिकेची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक निर्देश पंचायत समित्यांना देण्यात आले असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक अनिल गुंजे यांनी सांगितले. अभियानाच्या यशस्वितेसाठी स्वच्छ भारत मिशनचे माहिती, शिक्षण व संवाद तज्ज्ञ अतुल गजभिये, सर्वशिक्षा अभियानाचे जिल्हा समन्वयक (मुलींचे शिक्षण) बाळकृष्ण बिसेन, उमेदचे स्वप्नील अग्रवाल सहकार्य करीत आहेत.मुकाअ यांची चित्रपटगृहाला भेटजिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी शुक्रवारी (दि.३०) आमगाव येथील सोना चित्रपटगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांसह चर्चा केली. दरम्यान विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीं सुविधांची माहिती घेत त्यांनी जिल्ह्यातील सर्वच विद्यार्थिनींनी ‘पॅडमॅन’ चित्रपट पाहण्याचे आवाहन केले.