शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

बंदोबस्ताला आलेले जवान उपाशीच परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 06:09 IST

१५ गोंदिया कॅम्प नागपूर येथील ई कंपनीच्या जवांनाना सुरक्षेसाठी देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत बंदोबस्तासाठी नेमण्यात आले होते.

गोंदिया : भंडारा-गोंदिया व गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत बंदोबस्तासाठी एसआरपीएफच्या गट १५ गोंदिया कॅम्प नागपूर येथील ई कंपनीच्या जवांनाना सुरक्षेसाठी देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत बंदोबस्तासाठी नेमण्यात आले होते. परंतु मतदान झाल्यानंतर त्यांना जेवणही न देता त्यांना उपाशीपोटी लगेच परत पाठविण्यात आल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने जवांनानी मतदानाच्यावेळी चोख बंदोबस्त ठेवत कुठलीही चुक होऊ नये, याकरीता सतर्कतेने काम केले. त्यानंतर ११ एप्रिलला मतदान संपल्यानंतर लगेच ६ वाजताच पुणे येथे बंदोबस्तासाठी एसआरपीएफच्या जवानांना रवाना करण्यात आले. बोरगाव कँप येथे ५ मिनिटांचीही विश्रांतीही घेऊ दिली नाही. तातडीने पुणे ग्रामीण बंदोबस्तासाठी निघण्याचे आदेश देण्यात आले. परिणामी जवांनाना रात्रभर उपाशी प्रवास करण्याची वेळ आली. कारंजा लाड येथे पहाटे ४ वाजेच्या सुमारास पोहचताच थोडा वेळ जवांनानी तेथील एका पेट्रोलपंपावर विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला. सकाळच्या सुमारास प्रात:विधी करण्यास अधिकाऱ्यांनी वेळ न देताच ६ वाजेच्या सुमारास पुण्याकडे पोलीस वाहन निघाले. ११ एप्रिलला सायकांळी ६ वाजता निघालेल्या जवांनाना १३ एप्रिलला दुपारी १ वाजेपर्यंत नाष्टा किंवा जेवण उपलब्ध करून दिले गेले नाही. ३ दिवस झोप न झाल्याने आमची प्रकृती बिघडली असल्याची जवानांची भावना असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.>सर्व जवांनाना आम्ही फूड पॅकेट दिले होते. जेवण दिले नाही, अशी कुणाचीही तक्रार माझ्याकडे आलेली नाही. परंतु सोशल मीडियावरून चाललेल्या प्रकारावरून त्या कंपनीचे कमांडंट जावेद अन्वर यांच्याशी चर्चा केल्यावर अशा प्रकारची कसलीही तक्रार नसून त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.- विनीता शाहू, पोलीस अधीक्षक, गोंदिया>मी घाबरत नाहीसोशल मीडियाद्वारे जवानांनी गोंदियाच्या पोलीस अधीक्षकांना माहिती देण्याचा प्रयत्न केला. जवांनाच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था न करताच नायक पोलीस उपनिरिक्षक विश्वास हे रजेवर निघून गेले. परिस्थितीची जाणीव करु न दिल्यानंतरही त्यांनी मी कुणाला घाबरत नाही, असे म्हटल्याचे व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये नमूद केलेले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019bhandara-gondiya-pcभंडारा-गोंदिया