शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या चिंधीने झाकणार त्यांचा फाटका संसार

By admin | Updated: October 25, 2016 00:45 IST

दिवाळी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण. सुख आणि समृद्धी घेऊन येणाऱ्या ‘लक्ष्मी’चे स्वागत

‘नेकी की दिवार’ : गोरगरिबांच्या दिवाळीसाठी विश्व हिंदू परिषदेचा उपक्रमगोंदिया : दिवाळी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण. सुख आणि समृद्धी घेऊन येणाऱ्या ‘लक्ष्मी’चे स्वागत करण्यासाठी एकीकडे नवनवीन कपड्यांनी सजण्यासाठी खरेदीवर उड्या पडत आहेत. मात्र दुसरीकडे अंगावरच्या फाटलेल्या कपड्यांना शिवण्याचीही सोय नाही. हा विरोधाभास कमी करीत अनेकांचा फाटलेला संसार झाकण्याचा एक छोटेखानी प्रयत्न गोंदियात सुरू करण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी गोंदियाच्या नेहरू चौकात सुरू केलेल्या ‘नेकी की दिवार’ या उपक्रमात रस्त्यालगतच्या फुटपाथवर गरजवंतांसाठी जुने कपडे आणि वस्तू मोफत मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दिवाळीनिमित्त घरातील जुन्या वस्तू, जुने कपडे टाकून देण्याऐवजी ती वस्तू किंवा कपडे एखाद्या गरजवंताच्या कामी येत असेल तर किती समाधान मिळते याचा प्रत्यय सध्या गोंदियावासीय घेत आहेत. या ठिकाणी आपल्याकडे असलेली अधिकची किंवा दुसऱ्याच्या उपयोगात येणारी टाकाऊ वस्तू ठेवता येईल आणि गरज असलेल्या व्यक्तीला तीच वस्तू घेवून जाता येईल. इमानदारीवर हा उपक्रम उभा आहे. उघड्यावर संसार असलेल्या हजारो गरीबांंना आधार ठरणाऱ्या या फुटपाथवरील भिंतीला ‘नेकी की दिवार’ असे नाव ठेवण्यात आले आहे. मांगल्याचे प्रतिक असलेल्या दिवाळी सणाच्या पर्वावर विश्व हिंदू परिषदप्रणित बजरंग दलातर्फे या अभिनव आणि समाजाभिमुख उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमातून निराश्रीत, गरीबांच्या गरजा पूर्ण होणार असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आ.राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष भिकम शर्मा, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष उत्पल शर्मा, समाजसेवक उदय प्रमर, बजरंग दलाचे प्रांत संयोजक देवेश मिश्रा, विभाग संयोजक महेंद्र देशमुख, शिवसेनेचे जिल्हा राजू कुथे, उपसरपंच नीलेश देशभ्रतार, बंटी मिश्रा, पं.स.सदस्य योगराज उपराडे, संदीप कडूकर, रजनीश जायस्वाल, संजय जैन, रितेश अग्रवाल उपस्थित होते. बजरंग दलाचे जिल्हा मंत्री मनोज मेंढे, सुधीर ब्राम्हणकर, संतोष चंदेल, मिलिंद चौरे, सुनील तिवारी, सचिन गिव्हे, संजय दुबे, अनिल हुधान, हरिश अग्रवाल, रमन उके, मुकेश उपराडे, गणेश अग्रवाल, अमित झा, भारत शुक्ला,दिनेश द्विवेदी, वीरेंद्र आंबटकर, संजय जैन, प्रतीक कदम, मुक्तानंद ढोमणे, गुड्डा द्विवेदी, टिकलू बनोटे, लक्ष्मण नाटेश्वरी, ऋषी मिश्रा, प्रदीप ठवरे, देवा रुसे, अरुण चौधरी, दिनेश मिश्रा, राजू मारवाडे यांनी या उपक्रमाला यशस्वी करण्याचा संकल्प केला आहे.(तालुका प्रतिनिधी) नागरिकांनी सहकार्य करावे ४प्रत्येक परिवाराकडे काही तरी अशी वस्तू असते जी त्या परिवारासाठी उपयोगाची नसते. परंतु तीच वस्तू दुसऱ्या व्यक्तीची गरज भागवते. कपडे, भांडी, चप्पल, जोडे, बालकांची खेळणी अशा अनेक वस्तू जुन्या झाल्यानंतर त्या फेकून देतात किंवा त्या भंगारमध्ये विकल्या जातात. ४अशा वस्तू न फेकता किंवा त्यांची विक्री न करता शहरातील नागरिकांनी त्या वस्तू आणून ठेवाव्या, दरम्यान या भिंतीवर लावण्यात आलेल्या वस्तू कुणाच्याही कामी पडत असतील तर अशा गरजूंनी नि:संकोच त्या वस्तू घेवून जाण्याचे आवाहन करण्यात आल्याने गरजू सायंकाळी सायंकाळी ६ पासून रात्री ९ वाजतापर्यंत या भिंतीवरील वस्तू गरजू व्यक्तींना कोणतेही शुल्क न देता घेऊन जातात. ४उपक्रम अखंडीत चालत राहावा, यासाठी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. तेव्हा शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी अशा वस्तू आणून गरीबांच्या जीवनाला प्रकाशमान करण्याचे समाजकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.