शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' तरुणीला होती दुर्मिळ रक्तगटाची गरज; पोलिसाच्या पत्नीने घेतला 'हा' निर्णय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 14:38 IST

Gondia News एखाद्याचा रक्तगट दुर्मिळ असल्यास त्याला त्याच रक्तगटाच्या दात्याचा शोध घेणे हे किती अवघड जाते, याबद्दलचे अनेक किस्से आपण ऐकले व वाचले असतील. असाच एक किस्सा गोंदिया जिल्ह्यात घडला.

ठळक मुद्देरक्तपेढीत रक्ताचा तुटवडाएबी निगेटिव्ह रक्ताची होती गरज 

 लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : एखाद्याचा रक्तगट दुर्मिळ असल्यास त्याला त्याच रक्तगटाच्या दात्याचा शोध घेणे हे किती अवघड जाते, याबद्दलचे अनेक किस्से आपण ऐकले व वाचले असतील. असाच एक किस्सा गोंदिया जिल्ह्यात घडला. मात्र यात पोलिस व त्याच्या पत्नीने तात्काळ निर्णय घेऊन पुढाकार घेत रक्तदान केल्याने एका युवतीचे प्राण वाचले.

येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात दाखल एका युवतीला एबी निगेटिव्ह रक्ताची गरज होती. मात्र रक्तपेढीत तुटवडा असल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. दरम्यान याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांना मिळाली. त्यांचा पत्नीचा रक्तगट एबी  निगेटिव्ह असल्याने त्यांनी पत्नीसह लोकमान्य ब्लड बँक गाठून त्यांच्या पत्नीने रक्तदान केले. वेळीच रक्त मिळाल्याने युवतीचे प्राण वाचविणे शक्य झाले.

कोरोनामुळे सध्या रक्तदान शिबिरे बंद आहे. तर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुध्दा व्यापक स्तरावर सुरु आहे. त्यामुळे येथील रक्त पेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बरेचदा गरजू रुग्णांसाठी रक्त मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. असाच प्रकार शुक्रवारी (दि.३०) बाई गंगाबाई महिला रुग्णालयात घडला. या रुग्णालयात दाखल असलेल्या एका १९ वर्षीय तरुणीला एबी निगेटिव्ह रक्ताची गरज होती. मात्र गोंदिया रक्तपेढीत आणि खासगी रक्तपेढीत सुध्दा या रक्ताचा साठा नव्हता. त्यामुळे या तरुणीचा जीव धोक्यात आला होता. दरम्यान यासाठी अनेक स्वंयसेवी संस्थाशी संपर्क करण्यात आला.

गोंदिया येथील रक्त मित्र गुड्डू चांदवानी यांच्याकडे रक्तदात्यांची यादी होती. त्या यादीतील काही व्यक्तींशी संपर्क साधला. चांदवानी यांनी संदर्भात वाहतूक पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्याशी संपर्क साधृून त्यांना याची माहिती दिली. तायडे लगेच त्यांच्या पत्नीचा रक्तगट एबी निगेटिव्ह असल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी पत्नी किरणसह लोकमान्य ब्लड बँक गाठून रक्तदान केले. तायडे यांच्या पत्नीने वेळीच रक्तदान केल्याने त्या तरुणीचे प्राण वाचविणे शक्य झाले. एबी निगेटिव्ह रक्त हे फारच दुर्मिळ समजले जाते. मात्र रक्तदान हे महान दान समजून वेळीच माणुसकीचा परिचय देत किरण तायडे यांनी रक्तदान केल्याने तरुणीला नवसंजीवनी मिळाली. रक्त मित्रांमुळे झाली मदत येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात नेहमीच रक्ताचा तुटवडा पडतो. अशावेळी शहरातील अनेक स्वंयसेवी संस्थाचे पदाधिकारी व सदस्य रक्तदान करण्यासाठी धावून येतात. ते रक्तमित्र म्हणून काम करीत असतात. विनोद चांदवानी, रवी बोधानी, नितीन रायकवार या रक्तमित्रांमुळे युवतीचे प्राण वाचविणे शक्य झाले. कोणत्याही नात्यापेक्षा माणुसकीचे नाते हे सर्वात महत्वाचे आहे. संकट काळात मदतीला धावून जाणे यालाच माणुसकी म्हणतात हाच दृष्टीकोन बाळगून मी सुध्दा रक्तदान केले. गरजूंना रक्तदान करण्यासाठी इतरांनी सुध्दा निसंकोचपणे पुढे येण्याची गरज आहे. - किरण तायडे (रक्तदाता)

टॅग्स :Blood Bankरक्तपेढी