शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

समाज जोडण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 22:04 IST

सध्याच्या काळात समाजविषयक आपुलकी लुप्त होत चालली आहे. बंधूभावाच्या भावनेने समाज एकवटण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने नेहमी तत्पर रहावे.

ठळक मुद्देसमाज जोडण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा

ऑनलाईन लोकमतसाखरीटोला : सध्याच्या काळात समाजविषयक आपुलकी लुप्त होत चालली आहे. बंधूभावाच्या भावनेने समाज एकवटण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने नेहमी तत्पर रहावे. तसेच समाजामध्ये वावरणाऱ्या तरूणाईने समाज जोडण्यात विशेष पुढकार घेणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी अर्थ मंत्री महादेवराव शिवणकर यांनी केले.येथील युवा कुणबी समाज सेवा समितीवतीने जगतगुरु संत तुकाराम महाराज बीज समारंभ तसेच स्व. जगन दोनोडे व स्व. गंगाबाई दोनोडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्यामलाल दोनोडे यांनी कुणबी समाजासाठी दान दिलेल्या जागेवरील कुणबी समाज भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी वनमंत्री भरत बहेकार होते. पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, पं.स. सभापती सुनंदा बहेकार, लिलाधर पाथोडे, प्रमोद येटरे, तिरथ येटरे, शामालाल दोनोडे, तुकाराम बोहरे, संजू दोनोडे, सुभाष बागडे, प्रभाकर दोनोडे, भुमेश्वर मेंढे, कमलबापू बहेकार, रमेश चुटे, युगराम चुटे, राजू काळे, कृष्ण हुकरे, अनिल शिवणकर, रविशंकर हत्तीमारे, संजय ओकटे, राजकुमार फुंडे, गिरजाशंकर मेंढे, रमेश बहेकार, डॉ. रमेश बोहरे, देवराज खोटेले, टेकचंद फुंडे, माधोराव कोरे, प्रभू थेर, अनिल फुंडे, लेकराम भूते आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात संत तुकाराम महाराज व रयतेचे राजे शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांच्या पूजनाने झाली.या वेळी पाहुण्यांच्या हस्ते राजकीय क्षेत्रात भरारी घेणाºया विविध व्यक्तींचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात कुणबी समाजाच्या युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले आहे. तसेच १५ एप्रिल रोजी होणाऱ्या कुणबी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यावर विशेष चर्चा करण्यात आली आहे. समाजासाठी जमीन दान देणाºया श्यामलाल दोनोडे यांचे उपस्थित पाहुण्यांनी विशेष आभार मानले.संचालन युवा कुणबी समाज सेवा समितीचे अध्यक्ष देवराम चुटे यांनी केले. आभार पवन पाथोडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी पृथ्वीराज शिवणकर, संतोष बोहरे, नामदेव दोनोडे, अरविंद फुंडे, रामदास हत्तीमारे, पुरुषोत्तम कोरे, संजय बागडे, चंद्रकुमार बहेकार, देवेंद्र मुनेश्वर, मोहन दोनोडे, प्रेमलाल ठाकरे, योगेश बहेकार, प्रल्हाद मेेंढे, नंदू चुटे यांनी सहकार्य केले.