शहरं
Join us  
Trending Stories
1
गो इंडिगोच्या दिल्ली-वाराणसी फ्लाईटमध्ये अफरातफरी; प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या...
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोडच्या बोगद्यातून झिरपले पाणी; सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
4
डोंबिवली स्फोटाप्रकरणी दोषींवर होणार कारवाई; कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन
5
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: चंद्रपुत्र, विष्णुरुपी बुध करतो भाग्योदय; पाहा, प्रभावी मंत्र-उपाय
6
गुरु उदय: ६ राशींवर गुरुकृपा, परदेशातून उत्तम लाभ; उत्पन्न वाढीचे योग, इच्छापूर्तीचा काळ!
7
तिन्हीसांजेला ‘ही’ कामे अवश्य करा, होईल लक्ष्मीची अपार कृपा; धनवैभव, सुख-समृद्धीचा लाभ!
8
मुंबईतील मॉल्सची झाडाझडती; राजकोट येथील घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल अलर्ट मोडवर
9
स्फोटाचे बळी नेमके किती? ११, १२ की १३? डोंबिवलीतील यंत्रणांमध्ये एकवाक्यता नाही!
10
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
11
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
12
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
13
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
14
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
15
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
16
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
17
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
18
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
19
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
20
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप

तरुणांनो, थोडा धीर धरा, वडीलधाऱ्यांना द्या प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 5:00 AM

जिल्ह्यात मंगळवारपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला गती मिळाली होती. नऊ हजारांवर डोस यासाठी प्राप्त करून देण्यात आले होते. मात्र १ लाख ५३ हजार २२६ नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत होते; तर प्रत्येक जिल्ह्यात हेच चित्र होते. दुसरीकडे लसींचा पुरवठा अद्यापही वाढविण्यात आला नाही. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण काही दिवस बंद ठेवून दुसऱ्या डोस देण्यावर भर देण्याचे शासनाचे निर्देश आहेत.

ठळक मुद्दे१८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद : दुसऱ्या डोसला प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी सध्या प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला जात आहे. लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली होती. मात्र लसींचा अपुरा पुरवठा व दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची संख्या अधिक असल्याने शासनाने सर्व जिल्ह्यांना बुधवारपासून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण थांबविण्याचे निर्देश देत दुसऱ्याचे डोसचे लसीकरण वाढविण्याचे आदेश दिले. त्यामुळे ‘तरुणांनो, थोडा धीर धरा, वडीलधाऱ्यांना प्राधान्य द्या,’ अशीच स्थिती होती. जिल्ह्यात मंगळवारपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला गती मिळाली होती. नऊ हजारांवर डोस यासाठी प्राप्त करून देण्यात आले होते. मात्र १ लाख ५३ हजार २२६ नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत होते; तर प्रत्येक जिल्ह्यात हेच चित्र होते. दुसरीकडे लसींचा पुरवठा अद्यापही वाढविण्यात आला नाही. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण काही दिवस बंद ठेवून दुसऱ्या डोस देण्यावर भर देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे बुधवारपासून जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर या वयोगटातील नागरिकांना लसीकरण बंद करण्यात आले. विशेष म्हणजे या वयोगटातील नागरिकांचा लसीकरणाला प्रतिसाद वाढत असतानाच लसीकरण बंद करण्यात आल्याने युवकांचा हिरमोड झाला. मात्र पहिला डोस घेतल्यानंतर अनेकांना दुसरा डोस घेण्याचा कालावधी लोटून गेल्यानंतर लसींच्या तुटवड्यामुळे डोस घेता आला नव्हता. त्यामुळे दीड लाखावर नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत होते. आता शासनाच्या नवीन निर्णयाने ४५ वर्षांवरील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. काेव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्डचे डोस झाले प्राप्त आरोग्य विभागाने ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी आता कंबर कसली आहे; तर शासनाकडूनही यासाठी डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. बुधवारी जिल्ह्याला कोविशिल्डचे १८ हजार ५०० आणि कोव्हॅक्सिनचे १७०० डोस प्राप्त झाले आहे. या डोसचे बुधवारी सायंकाळीच सर्व केंद्राना वाटप करण्यात आले. त्यामुळे लसीकरणासाठी डोसचा तुटवडा नसल्याचे लसीकरण अधिकारी डॉ. भूमेश पटले यांनी सांगितले. १४० केंद्रांवर सुरू होणार लसीकरण आज, गुरुवारपासून जिल्ह्यातील सर्व १४० केंद्रांवर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाणार आहे. या सर्व केंद्रांवर ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. जवळपास १ लाख ५३ हजार २२६ नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असून, आता या सर्वांना दिलासा मिळाला आहे. लसीकरणात ज्येष्ठांची आघाडी जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८९ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात सर्वांत पुढे ज्येष्ठ नागरिक असून ६७५४६ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे; तर ४५ वर्षांवरील ६५३२४ नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. १८ ते ४४ वयोगटातील ५६४३ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.  

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस