शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हीच सांगा! अभ्यास करायचा की पडताळणीसाठी पायपीट करायची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 05:00 IST

शासनाचे सचिव यांचे २७ नोव्हेंबर २०१७ च्या जीआर नुसार अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यात स्पष्ट केले की, अर्जदाराच्या रक्तसंबंधातील वडिलांचे किंवा सख्ख्या चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्तसंबंधातील इतर कोणत्याही नातेवाइकाचे वैधता प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास तो महत्त्वाचा पुरावा म्हणून नियम क्र. ५ मधील उपनियम ६ नुसार इतर पुराव्यांची मागणी न करता संबंधित अर्जदाराने सादर केलेले वैधता प्रस्तावपत्र महत्त्वाचा पुरावा मानून जात प्रमाणपत्र देण्यात यावे असे निर्देश दिले आहे. 

कालीदास सूर्यवंशीलोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : जिल्हा जात पडताळणी समितीकडून शासनाने जी. आर. निर्गमित केल्यानंतरही संपूर्ण पुराव्याची अट घालून विद्यार्थ्यांचे प्रस्ताव परत पाठविले जात आहेत. यामुळे परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांना कार्यालयाच्या पायऱ्या झिजविण्यात वेळ खर्ची घालावा लागत आहे. सत्र २०२१ ते २०२२ या शैक्षणिक सत्रात मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन प्रस्ताव जात पडताळणी समितीकडे सादर केले आहेत. जातवैधता प्रमाणपत्रासाठी लागणारे १९५०चे तसेच १९६७ च्या पूर्वीचे वडिलांचे, आजोबांचे, पणजोबांचे शैक्षणिक पुरावे अथवा अधिवासाचा पुरावा वंशावळीनुसार पुरावा म्हणून जिल्हा जात पडताळणी समितीकडे सादर केल्यानंतरही कमिटी पुन्हा शैक्षणिक अभिलेख, कोतवाली नोंद, महसूली नोंद, अधिकार अभिलेख एकत्रीकरण या दस्तऐवजांसाठी तगादा लावत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. शासनाचे सचिव यांचे २७ नोव्हेंबर २०१७ च्या जीआर नुसार अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यात स्पष्ट केले की, अर्जदाराच्या रक्तसंबंधातील वडिलांचे किंवा सख्ख्या चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्तसंबंधातील इतर कोणत्याही नातेवाइकाचे वैधता प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास तो महत्त्वाचा पुरावा म्हणून नियम क्र. ५ मधील उपनियम ६ नुसार इतर पुराव्यांची मागणी न करता संबंधित अर्जदाराने सादर केलेले वैधता प्रस्तावपत्र महत्त्वाचा पुरावा मानून जात प्रमाणपत्र देण्यात यावे असे निर्देश दिले आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांतून उमेदवाराचे प्रस्ताव आले असून, आता परीक्षा तोंडावर असल्याने विद्यार्थ्यांची मोठी धावपळ होत आहे. तरी शासन निर्णयानुसार प्रकरणाचा निपटारा करून दावे त्वरित निकाली काढण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

 

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्र