शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

योगामुळे कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार

By admin | Updated: June 22, 2015 00:34 IST

आंतरराष्ट्रीय योग दिवस जिल्ह्यात सर्वत्र उत्साहरात साजरा केला जात असतानाच ..

विजय सूर्यवंशी : आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरागोंदिया : आंतरराष्ट्रीय योग दिवस जिल्ह्यात सर्वत्र उत्साहरात साजरा केला जात असतानाच यात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पोलीस अधिक्षक कार्यालयानेही भाग घेतला. योगदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध प्रकारची योगासने केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दररोज सकाळी योगासने करावीत. योगासनामुळे कार्यक्षमता वाढण्यात मदत होते. अनेक कामे वेळीच पार पाडता येतात. योगासनामुळे मनुष्य निरोगी राहतो व शरीर बळकट बनते आणि काम करण्यास उत्साह निर्माण होतो. त्यामुळे कामे वेळीच पार पाडण्यास मदत होते. याप्रसंगी पतंजलीचे योग प्रशिक्षक अशोक मिश्रा व उषा वाजपेयी यांनी प्रात्यक्षिकाद्वारे उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विविध प्रकारची योगासने करवून घेतली व योगासनाचे महत्व पटवून दिले.यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश मोहीते, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे व अन्य उपस्थित होते. विशेष म्हणजे योगदिनानिमित्त जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांसह विविध सामाजीक संस्थांनीही पुढाकार घेत योगदिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (शहर प्रतिनिधी)योग दिनानिमित्त सायकल रॅलीआंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून येथील इंदिरा गांधी स्टेडियम येथे क्रीडा विभागाच्यावतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी व प्राध्यापक ललीत जिवानी यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. ही रॅली इंदिरा गांधी स्टेडियम, काले खा चौक, पाल चौक, मनोहर चौक, रामनगर बाजार चौक, यादव चौक, चांदणी चौक, गांधी प्रतिमा, जयस्तंभ चौक, आंबेडकर चौक या मार्गाने मार्गक्रमण करीत निघाली व रॅलीचा समारोप इंदिरा गांधी स्टेडियम येथे करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा मार्गदर्शक अरुणा गंधे, भोजराज चौधरी, क्रीडा शिक्षक विशाल ठाकूर, राठोड, चेतन मानकर, आलोक तुरकर, अनमोल गंधे, दुलीचंद मेश्राम, पंकज पांडे व पार्टीन यांनी सहकार्य केले.