शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

शेळीपालनातून सावरला ‘माधुरी’चा संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 22:13 IST

आर्थिक उत्पन्नाचे कसलेही साधन नसलेल्या तिरोडा तालुक्याच्या सोनेखारी येथील माधुरी तेजराम धुर्वे यांनी राणी लक्ष्मीबाई स्वयंसहायता महिला बचत गटात प्रवेश केला. गटातून कर्ज घेवून शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला व आपला संसार सावरला.

ठळक मुद्देराणी लक्ष्मीबाई स्वयंसहायता महिला बचत गट : सासूने दिली साथ, एकापासून १० शेळ्या

ऑनलाईन लोकमतगोंदिया : आर्थिक उत्पन्नाचे कसलेही साधन नसलेल्या तिरोडा तालुक्याच्या सोनेखारी येथील माधुरी तेजराम धुर्वे यांनी राणी लक्ष्मीबाई स्वयंसहायता महिला बचत गटात प्रवेश केला. गटातून कर्ज घेवून शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला व आपला संसार सावरला.सोनेखारी येथे १६ डिसेंबर २०१३ रोजी सदर बचत गटाची स्थापना झाली. त्यात माधुरी सदस्य आहेत. उत्पन्नाचे साधन नसल्याने त्या जास्त बचत करू शकत नव्हत्या. त्यांची मासिक बचत ५० रूपये होती. गटात प्रवेश केल्यावर पाच हजार रूपयांचे अंतर्गत कर्ज घेवून त्यांनी एक शेळी खरेदी केली. तिचे चांगले पालन केल्यावर तिने दोन पिल्ले दिले. त्यांचेही चांगले पालन केले. ते मोठे झाल्यावर त्यांच्याकडे आता तीन शेळ्या झाल्या.त्यानंतर बचत गटाला १५ हजार रूपयांचा फिरता निधी (आरएफ) मिळाला. ते १५ हजार रूपयांची माधुरी यांनीच उचल केली व त्यातून तीन शेळ्या खरेदी केल्या. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात भर पडू लागली. वर्षभरानंतर बचत गटाची मासिक बचत १०० रूपये प्रत्येकी करण्यात आले.सासू घरी राहत असत. आता घरच्या सहा शेळा सासू चारायला नेवू लागल्या. इकडेतिकडे बसून राहण्यापेक्षा व दुसºयांच्या शेळ्या चारण्यापेक्षा घरच्याच शेळ्या चारायला नेण्यासाठी सासूने माधुरी यांना सहकार्य केले. त्यामुळे उत्पन्नात वाढ होवू लागली. आधी त्यांच्याकडे उत्पन्नाचे साधन नव्हते. पण गटात आल्यानंतर एका शेळीपासून आज त्यांच्याकडे १० शेळ्या झाल्या. ही वाढ म्हणजेच त्यांचे उत्पन्न आहे. मजुरी व शेळ्या विक्रीतून आता त्या अंतर्गत कर्ज व खेळत्या निधीची योग्यरित्या परतफेड करीत आहेत.गटात आल्यामुळेच त्यांच्या कुटुंबाला एक स्वयंरोजगार मिळाला आहे. त्यांच्या घरी सासू, पती, दोन मुले व त्या असा पाच जणांचा कुटुंब आहे. पती मजुरी करतात व सासू शेळ्या चारतात.मूल लहान असल्यामुळे माधुरी मजुरीला जात नाही. पण गटात समाविष्ट झाल्यामुळे त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व आर्थिक उत्पन्नात भर पडला.गटामुळे व्यवहार कौशल्याचे ज्ञानगटात येण्यापूर्वी माधुरी यांना गट म्हणजे काय, परिचय म्हणजे काय, हे कळत नव्हते. चार चौघांमध्ये बोलता येत नव्हते. मात्र गटात आल्यावर त्या बोलक्या झाल्या. स्वत:चा परिचय सांगू लागल्या. गटापासून त्यांना खूप काही शिकायला मिळाले. त्या घराबाहेर पडल्या. आजची महिला कशी असावी, याची जाण त्यांना झाली. बाहेरचे व्यवहार करायला शिकल्या. त्या बँक व्यवहारही करू लागल्या. त्यामुळे त्यांनी आपले गट व महिला आर्थिक विकास महामंडळाचे आभार मानले.