शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

एमआयईटीत रोबोटवर कार्यशाळा

By admin | Updated: February 29, 2016 01:28 IST

इंजिनिअरींग व टेक्नालॉजीत सातत्याने होत असलेल्या बदलाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालयातर्फे ...

१३० विद्यार्थ्यांचा सहभाग : ४० जणांची स्पर्धेसाठी निवड गोंदिया : इंजिनिअरींग व टेक्नालॉजीत सातत्याने होत असलेल्या बदलाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालयातर्फे आर्डीनो व रोबोटिक्स विषयावर तीन दिवसांची कार्यशाळा आ.राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात प्राचार्य डॉ.एस.एस. राठोड यांनी आयोजित केली होती. या कार्यशाळेत १३० विद्यार्थी सहभागी झाले होते.कार्यशाळेचे उद्घाटन विभाग प्रमुख प्रा.देवेंद्रकुमार पांडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. अतिथी म्हणून ए.के.सिंग, प्रांजल कुमार, संयोजक संजय असाटी उपस्थित होते. स्व. मनोहरभाई पटेल यांच्या तैलचित्रावर माल्यार्पण करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रा. पांडे यांनी रोबोटची उपयोगिता यावर मार्गदर्शन केले. औद्योगिक व घरगुती कामासाठी रोबोटची कार्यपध्दती व सहकार्य यावर माहिती दिली. प्रास्ताविक संजय असाटी यांनी केले. विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थी टिकावे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. नोडल राऊंड ने दहा चमूत ४० विद्यार्थ्यांची निवड केली. सदर निवड झालेले विद्यार्थी ३ ते ५ मार्च दरम्यान आयआयटी खडगपूर येथे होणाऱ्या स्पर्धेत भाग घेणार आहेत. यावेळी लिग व नॉनआऊट आधारावर घेण्यात आलेल्या रोबमेक सोहळा या स्पर्धेत ३२ चमूनी भाग घेतला. यात युवराज कावळे, जय चव्हाण, विकास डोंगरवार व जयेश पटले यांची चमू विजयी तर नेहा उपवंशी, स्वप्नील जैन, शितल चौधरी, विशाखा पटले यांच्या चमूला उपविजेती चमू म्हणून घोषीत करण्यात आले. विजेता व उपविजेता चमूला आंतरराष्ट्रीय मानक संस्थान, ह्युस्टन (अमेरिका) येथील प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले. यशस्वीतेसाठी डॉ.विजय चौरसिया, प्रा. हितेश जोशी, एम.आर.वैद्य, शुभम बैस, संकेत भुजाडे, परेश चव्हाण, सचिन बिसेन, धर्मांशु अग्रवाल, सागर दोनोडे, राहुलसिंग, रोहीत बादुले, मोनालिसा व दिशा यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)