गोंदिया : जिल्ह्यातील आगामी नगर पंचायत निवडणुकीत निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विजय मिळणार. पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी पक्ष उमेदवारांसाठी एकजुटीने कार्य करावे, असे आवाहन आ. राजेंद्र जैन यांनी केले.नगर पंचायत निवडणूक व संघटन या विषयावर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या वेळी मार्गदर्शन करीत होते. ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत एकजुटतेने कार्य केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासासाठी कार्य करतो, हे जनतेला माहीत आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकजुट होवून पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी परिश्रम घ्यावे, त्यामुळे राकाँ पक्षाच्या उमेदवारांना यश मिळेल, असे ते म्हणाले. बैठकीत माजी आ. दिलीप बन्सोड, विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, राजलक्ष्मी तुरकर यांनी आपले विचार व्यक्त करून उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कार्य करावे, असे आवाहन केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, गंगाधर परशुरामकर, अशोक शहारे, मनोहर चंद्रिकापुरे, रमेश ताराम आदी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनो, एकजुटीने कार्य करा- राजेंद्र जैन
By admin | Updated: October 6, 2015 02:27 IST