शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

कार्यकर्त्यांनो, निवडणुकीसाठी सज्ज व्हा

By admin | Updated: June 29, 2016 01:48 IST

शासनाच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ देण्यासाठी कार्यकर्त्यांना कार्य करायचे आहे.

बडोले यांचा सत्कार : भाजपची जिल्हा बैठक, अनेकांचा भाजप प्रवेशगोंदिया : शासनाच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ देण्यासाठी कार्यकर्त्यांना कार्य करायचे आहे. भाजप कार्यकर्त्यांचा पक्ष असून लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते यांच्यात नेहमी समन्वय राहणे गरजेचे आहे. मागील निवडणुकीत पक्षाच्या मतदानाची टक्केवारी वाढली आहे. आता काही दिवसांत जिल्ह्यात नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. संपूर्ण ताकदीने लढून भाजपची सत्ता स्थापित करून शहरांचा विकास साधायचा आहे. यासाठी प्रत्येक बुथ मजबूत करून कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहावे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी केले.अर्जुनी-मोरगाव येथे भाजपच्या जिल्हा बैठकीत कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करीत होते.याप्रसंगी प्रामुख्याने पालकमंत्री राजकुमार बडोले, खा. नाना पटोले, खा. अशोक नेते, डॉ. उपेंद्र कोठेकर, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, सुभाष पारधी, माजी आ. केशव मानकर, दयाराम कापगते, भेरसिंह नागपुरे, भजनदास वैद्य, विनोद अग्रवाल, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, जि.प. सभापती देवराम वडगाये, छाया दसरे, झामसिंग येरणे, राधेशाम अग्रवाल, महिला मोर्चा प्रदेश सचिव सीता रहांगडाले, दिनेश दादरीवाल, पं.स. सभापती अरविंद शिवणकर, कविता रंगारी, दिलीप चौधरी, देवकी मरई, विरेंद्र अंजनकर, भाऊराव उके, रविकांत बोपचे, लायकराम भेंडारकर, संतोष चव्हाण, संजय कुलकर्णी, भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, भावना कदम, रघुनाथ लांजेवार, हनुवत वट्टी, अलताफ हमीद, अमित बुद्धे, किशोर हालानी, नामदेव कापगते, लक्ष्मीकांत धनगाये, रेखलाल टेंभरे आदी उपस्थित होते. खा. पटोले यांनी केंद्र सरकारच्या योजनांसाठी नरेंद्र मोदी अ‍ॅप सुरू केला असल्याचे सांगून तो स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करून प्रत्येक योजना माहिती करून घेता येणार असल्याचे सांगितले. भाजप शासन सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठिशी असून धानावर बोनस देवून त्याचा मोबदलाही त्वरित देण्यात येत आहे. येणाऱ्या नगर परिषद निवडणूक स्व बळावर लढून सत्ता स्थापित करणार. तसेह सहकार क्षेत्रात पुढे जाण्याचेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. डॉ. उपेंद्र कोठेकर म्हणाले, प्रधानमंत्री मोदी यांनी दोन वर्षाच्या काळात जनकल्याण व देश विकासाच्या ५४ महत्त्वांच्या घोषणा व योजना आणल्या. या योजना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करावे, असे आवाहन केले. यानंतर नगर परिषद निवडणुकांसंदर्भात आ.विजय रहांगडाले व माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी मार्गदर्शन करून नवीन मतदारांची नोंदणी करण्यास सांगितले. खा. अशोक नेते यांनी केंद्र शासनाच्या योजनांची माहिती दिली. आ. संजय पुराम यांनी वचनपूर्ती व विकासपर्व याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेशच्या बैठकीत खा. नाना पटोले यांच्या शेतीविषयक ठरावाबाबत माजी आ. केशवराव मानकर यांनी माहिती देवून तो ठराव बैठकीत ठेवला. यात शेतीला १०० टक्के सिंचनासाठी प्रयत्न, राज्यातील सर्व नद्या जोडण्याचा प्रस्ताव, जलयुक्त शिवार योजना, शेतीपीक विमा योजना याबद्दल प्रस्ताव ठेवून मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.माजी आ. कापगते यांनी, ही योजना महाराष्ट्राचा कायापालट करणारी असल्याचे सांगितले. माजी आ. भेरसिंह नागपुरे यांनी खा. पटोले यांच्या ठरावावर धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळणार असल्याचे सांगितले. रचना गहाणे यांनी जिल्हा परिषदेच्या योजना व केलेल्या विकासात्मक कामांची माहिती दिली. या वेळी ना. राजकुमार बडोले यांनी २६ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धर्मांतरित नवबौद्धांचा प्रश्न निकाली लावल्याने केंद्र सरकारद्वारे कोट्यवधी बौद्ध बांधवांना आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक सोयीसुविधा व लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. या मोठ्या कार्याबद्दल ना. बडोले यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. यात लॉर्ड बुद्धा मैत्री संघाचे रतन वासनिक, काँग्रेसचे श्याम चौरे, कुंदा भास्कर, सुधा बनाफर इतर अनेकांचा समावेश आहे. संचालन विरेंद्र अंजनकर यांनी केले. याप्रसंगी मंडळ अध्यक्ष उमाकांत ढेंगे, प्रमोद संगीडवार, छत्रपाल तुरकर, सुनील केलनका, विजय बिसेन, लक्ष्मण भगत, भाऊराव कठाणे, सलाम शेख, अ‍ॅड. येशुलाल उपराडे, पप्पू अटरे, परसराम फडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)