शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांनो, जोमाने कामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 22:06 IST

भाजपाचे सरकार खोटारडे आहे. सामान्य जनता, शेतकरी, व्यापारी व युवकांचे सरकारद्वारे नवनवीन कायदे तयार करुन शोषण केले जात आहे.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : जिल्हा राष्टÑवादी काँग्रेसची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भाजपाचे सरकार खोटारडे आहे. सामान्य जनता, शेतकरी, व्यापारी व युवकांचे सरकारद्वारे नवनवीन कायदे तयार करुन शोषण केले जात आहे. या खोटारड्या सरकारला धडा शिकविण्यासाठी गाव पातळीवरुन कार्यकर्त्यांनी समोर येणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे, असे आवाहन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.जिल्हा राष्टÑवादी काँग्रेसच्यावतीने बैठक घेण्यात आली. या वेळी ते राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते.खासदार पटेल पुढे म्हणाले, मन की बात आता संपली आहे. पंतप्रधानांच्या भाषणाला जनता कंटाळली आहे. नोटबंदी व जीएसटीचे दुष्परिणाम सामान्य जनता भोगत आहे. सध्याचे सरकार हे देशात आर्थिक संकट निर्माण करीत आहे. विरोधक माझ्याविषयी अपप्रचार करुन कार्यकर्त्यांचे मनोबल कमी करीत आहेत. तेव्हा कार्यकर्त्यांनी खचून जावू नये. येथून निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणून ते कार्य करीत आहेत. पण सामान्य जनतेची कामे किती करीत आहेत, हे आता सर्वांना दिसून येत आहे. मी नेहमीच भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील जनतेसाठी काम काम करीत राहणार असल्याचे सांगितले.जिल्ह्यात होवू घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यानी एकदिलाने काम करुन भाजप सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचे आवाहन ना.पटेल यांनी केले. या वेळी तालुकाध्यक्ष व पदाधिकाºयांनी त्यांच्या मार्गदर्शनात सर्व कार्यकर्त्यांनी गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचून त्यांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी भाजप व काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्टÑवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष विनोद हरिणखेडे यांनी केले. आभार शहर अध्यक्ष अशोक शहारे यांनी मानले. बैठकीत प्रामुख्याने माजी आ. राजेंद्र जैन, माजी आ. दिलीप बन्सोड, विजय शिवणकर, राजलक्ष्मी तुरकर, अशोक शहारे, देवेंद्रनाथ चौबे, अशोक गुप्ता, मनोहर चंद्रिकापुरे, रमेश ताराम, महेश जैन, गंगाधर परशुरामकर, कुंदन कटारे, छोटू पटले, दामोदर अग्रवाल, हिरालाल चव्हाण, केतन तुरकर, किशोर तरोणे, नामदेव डोंगरवार, शिव शर्मा, कमल बहेकार, पंचम बिसेन, के.बी. चव्हाण, प्रेम रहांगडाले, जिब्राईल पठान, डॉ. अविनाश काशिवार, केवल बघेले, डॉ. अविनाश जायस्वाल उपस्थित होते.