शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांच्या समन्वयातून चांगले काम करणार

By admin | Updated: September 20, 2015 02:15 IST

जिल्हा परिषदेत सर्वच विभागात अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत विविध पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामे तत्परतेने करताना थोडी अडचण निश्चित होत आहे.

मनोज ताजने गोंदियाजिल्हा परिषदेत सर्वच विभागात अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत विविध पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामे तत्परतेने करताना थोडी अडचण निश्चित होत आहे. पण तरीही सर्वांच्या समन्वयातून जिल्हा परिषदेच्या योजनांची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. सर्वसामान्यांची कामे झाली पाहीजे यावर आपण भर देत असून त्यासाठी सर्वांना घेऊन चालणार आहे, अशी भावना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केली.१५ सप्टेंबरला जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून दोन महिन्यांचा कार्यकाळ उषाताईंनी पूर्ण केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील एकूण वातावरणाचा त्यांनी केलेला अभ्यास आणि जि.प.च्या आपल्या कार्यकाळात त्या कशा पद्धतीने कारभारावर आपली छाप पाडणार याबद्दल त्यांना बोलते केले. त्यावर त्यांनी मनमोकळेपणाने आपल्या भावना वक्त केल्या.उषाताई म्हणाल्या, यापूर्वी जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण समितीची सभापती म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे सत्तेत राहून काम करण्याचा त्यावेळचा अनुभव आता कामी येत आहे. दोन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची खुर्ची मिळाल्यानंतर येथील कारभारात फारशा काही त्रुट्या आढळल्या नाहीत. सर्व विभाग आपापल्या जागी काम करीत आहेत. काही योजनांसाठी निधीची गरज आहे. त्यासाठी प्रयत्नशील आहे. सोबतच कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. रिक्त असलेली सर्व विभागांची पदे भरण्यासाठी आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळेच काही महिन्यात रिक्त पदांचा अडसर दूर होईल.गेल्यावेळी जिल्हा परिषदेत पूर्णपणे भाजपची सत्ता होती. त्यावेळी अनेक कारणांनी जिल्हा परिषद गाजत होती. आता नवीन पदाधिकाऱ्यांच्या काळात कसे वातावरण राहणार, याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, जिल्हा परिषदेत आधीचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये कोणती भांडणे होत होती, किंवा कोण कोणावर वरचढ होत होते यात मी पडणार नाही. पण माझ्या कार्यकाळात असे काही होणार नाही. जिल्हा परिषद म्हणजे माझे दुसरे घर आहे. इथे सर्वांना घेऊन चालावे लागणार आहे. कामात राजकारण करणार नाही. आता तर सर्व कामे ई-टेंडर पद्धतीने आणि नियमानुसार होतील. कामात पारदर्शकता ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. अधिकारी पदाधिकाऱ्यांवर वरचढ होणार नाही. लोकांची कामे करण्यासाठी आम्ही बसलो आहोत. अनेक ग्रामीण लोक माझ्याकडे येऊन समस्या मांडतात. त्यांचे समाधान झाले पाहीजे असा प्रयत्न सुरू असतो.भाजपसोबत जुळवून घेताना काही अडचणी येत नसल्याचे सांगत कामात पक्षीय मतभेद करणार नसल्याचे त्या म्हणाल्या. जिल्हा परिषदेच्या सर्व ५३ सदस्यांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. संपूर्ण जिल्हा हे माझे कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे एखाद्या सदस्याच्या क्षेत्रातील समस्या ही त्याची समस्या नसून ती माझी समस्या आहे असे समजून मी ती सोडविण्यासाठी प्राधान्य देणार आहे.‘‘जिल्हा परिषदेत आधीचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये कोणती भांडणे होत होती, किंवा कोण कोणावर वरचढ होत होते, यात मी पडणार नाही. पण माझ्या कार्यकाळात असे काही होणार नाही. जिल्हा परिषद म्हणजे माझे दुसरे घर आहे. इथे सर्वांना घेऊन चालावे लागणार आहे. कामात राजकारण करणार नाही.’’प्रत्येक सभेनंतर देणार पत्रकारांना माहितीपत्रकारांचा मी खूप आदर करते. ते समाजाचा आरसा आहेत. त्यांना सर्वसाधारण सभेदरम्यान सभागृहात प्रवेश नसला तरी सभेनंतर प्रत्येक वेळी पत्रपरिषद घेऊन सभागृहात झालेल्या महत्वाच्या चर्चेची, निर्णयांची माहिती देणार असल्याचे उषाताईंनी सांगितले. महिला सरपंचांना देणार बळआता ५० टक्के ग्रामपंचायतींवर महिला सरपंच विराजमान झाल्या आहेत. त्यांना कामे करताना अनेक अडचणी येतात. माझ्याशी बोलताना त्या आपल्या अडचणी सांगतात. त्यामुळे त्या अडचणींवर मात करून कशा पद्धतीने ‘स्ट्राँग’ व्हायचे याचे प्रशिक्षण त्यांना दिले जाईल. त्या स्ट्राँग झाल्या तर त्यांचा कारभार स्ट्राँग होईल. त्यामुळे त्यांना बळ देणे गरजेचे असल्याचे उषाताई म्हणाल्या.