शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

अंडरग्राउंड केबलचे काम जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 22:11 IST

वीज वितरण कंपनीकडून शहरातील मुख्य बाजार भागात अंडरग्राऊंड केबलच्या कामाला जोमात सुरूवात करण्यात आली आहे. ५० लाख रूपयांच्या निधीतून बाजारातील गांधी प्रतिमा ते श्री टॉकीज चौक व नेहरू चौक ते गांधी प्रतिमा चौकापर्यंत अंडरग्राऊंडचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देमहावितरणची आयपीडीएस योजना : ५० लाख रूपयांचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वीज वितरण कंपनीकडून शहरातील मुख्य बाजार भागात अंडरग्राऊंड केबलच्या कामाला जोमात सुरूवात करण्यात आली आहे. ५० लाख रूपयांच्या निधीतून बाजारातील गांधी प्रतिमा ते श्री टॉकीज चौक व नेहरू चौक ते गांधी प्रतिमा चौकापर्यंत अंडरग्राऊंडचे काम सुरू आहे.बाजार भागात सध्या स्थितीत वीज तारांचे जाळे तयार झाले आहे. या वीज तारांतून कित्येकदा शॉटसर्कीट होऊन अपघात घडले आहेत. त्यामुळे वीज तारांचे हे जाळे धोकादायक ठरत आहेत. आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नाने कॉंग्रेस शासन काळात सुशिलकु मार शिंदे उर्जा मंत्री असताना गोंदिया शहराला एपीडीआरपी योजनेत समाविष्ट करण्यात आले. यातून शहरातील जीर्ण वीज वाहिन्यांच्या नविनीकरणासोबतच १०० हून जास्त ट्रासंफॉर्मर लावण्यात आले. तसेच कमी वीज दाबाच्या समस्येसाठी भिमघाट, सेल्सटॅक्स कॉलनी, कटंगी व हिवरा येथे वीज उपकेद्रांची स्थापना करण्यात आली.यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याची समस्याही सुटली. वीज तारांच्या गुंतागुंतीची समस्या सोडविण्यासाठी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शहराला आयपीडीएस योजनेत समाविष्ट केले. या योजनेंतर्गत शहरातील जास्त जंनसंख्येचे घनत्व असलेल्या व अरूंद भागातील वीज वाहिन्या अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू आहे. यातूनच शहरातील नेहरू चौक ते दुर्गा चौक तसेच गांधी प्रतिमा ते श्री टॉकीज चौक पर्यंतच्या वीज तारांना अंडरग्राऊंड करण्याचे काम केले जात आहे. सध्या वीज खांबांवरून ग्राहकांना वीज जोडणी दिली जाणार आहे. मात्र भविष्यात वीज खांब हटवून अंडरग्राऊंड करण्याचीही योजना आहे. बाजार भागातील वीज तार अंडरग्राऊंड होणार असल्याने जीवंत वीज तारांची गुंतागंूत व त्यामुळे निर्माण होणार धोका कायमचा टळणार आहे. बाजार भागात इमारतींना लागून वीज तार जात असून असे हे धोकादायक प्रकार संपुष्टात येतील.