शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
2
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
3
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
4
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
5
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
6
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
7
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
8
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
9
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
10
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
11
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
12
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
13
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
14
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
15
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
16
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
17
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
18
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
19
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
20
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे

व्यावसायिक पद्धतीने कामे करा

By admin | Updated: November 8, 2015 01:46 IST

टसर सिल्कचे उत्पादन हे अतिशय कष्टाचे काम आहे. मात्र यातून तुम्हाला भविष्यात चांगला रोजगार मिळेल.

आंधळगाव येथे पाहणी : माविमच्या कुसुम बाळसराफ यांचे आवाहनभंडारा : टसर सिल्कचे उत्पादन हे अतिशय कष्टाचे काम आहे. मात्र यातून तुम्हाला भविष्यात चांगला रोजगार मिळेल. त्यासाठी महिलांनी गटात एकजुट ठेवावी. यातून मिळणारा नफा सर्वांनी समान वाटुन घ्यावा आणि कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उत्पादन करण्यासाठी व्यावसायिक पदधतीने काम करावे, असे प्रतिपादन माविमच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक कुसुम बाळसराफ यांनी केले. आंधळगाव येथे सुरू करण्यात आलेल्या हॅण्डलुमचे उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी धीरजकुमार, डॉ.उल्हास बुराडे, माविमच्या जिल्हा समन्वयक ज्योती निंभोरकर, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ.नलिनी भोयर उपस्थित होत्या. जिल्ह्यात माविम आणि रेशिम विभागाच्यावतीने सुरू असलेले काम पाहण्यासाठी कुसुम बाळसराफ आणि जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी बचत गटामार्फत सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. जामगाव, वरठी, आंधळगाव येथे भेट देऊन त्यांनी टसर कोष ते साडी उत्पादनाची संपुर्ण प्रक्रिया समजावून घेतली. गोसेखुर्द प्रकल्पात पुनर्वसित झालेले जामगाव येथे बचत गटामार्फत गावाला लागून असलेल्या जंगलात टसर कोषाचे उत्पादन घेण्याचे काम सुरू करण्यात आले. तिथे त्यांनी भेट दिली. एका हंगामात किती पीक घेऊ शकतात. निसर्गाचा पीक उत्पादनावर कसा परिणाम होतो. महिलांना यामधून किती रोजगार मिळू शकतो, याची माहिती त्यांनी जाणून घेतली. महिलांशी संवाद साधुन येणाऱ्या अडचणी समजुन घेतल्या. या गावातील महिलांचे जीवन मजुरीवरच असल्याने हे पीक हातात येईपर्यत मजुरीचा प्रश्न सोडविण्यासाठी किंवा याला मग्रारोहयोशी जोडण्यासाठी प्रस्ताव तयार करून शासनाकडे विचारार्थ पाठवू, असे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सांगितले. वरठी येथे काथावर्क करणाऱ्या बचतगटाचे काम त्यांनी पाहिले. महिलांकडून उत्पादित ब्लॉक प्रिंट आणि काथावर्क केलेली चादर, साड्यांवर करण्यात येणारे सुंदर आणि उच्चतम दर्जाचे कलाकुसर पाहून त्यांनी महिलांचे कौतुक केले. (शहर प्रतिनिधी)