शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

२४ ग्रा.पं.ची कामे एक वर्षापासून ठप्प

By admin | Updated: July 2, 2014 23:21 IST

मग्रारोहयोच्या कामासाठी आधी पैसा देता येत नाही व रॉयल्टी काढल्याशिवाय मुरुम नेता येत नाही. या भानगडीत सडक/अर्जुनी तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींचीे कामे ेमागील एक वर्षांपासून ठप्प पडली आहेत.

महसूल वांद्यात : भ्रष्टाचार विरोधी न्यास करणार जनआंदोलनगोंदिया : मग्रारोहयोच्या कामासाठी आधी पैसा देता येत नाही व रॉयल्टी काढल्याशिवाय मुरुम नेता येत नाही. या भानगडीत सडक/अर्जुनी तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींचीे कामे ेमागील एक वर्षांपासून ठप्प पडली आहेत. या समस्येकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने आंदोलनाचा इशारा भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासचे अध्यक्ष माधवराव तरोणे यांनी खंडविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. सडक/अर्जुनी तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीच्या पांदण रस्त्याचे व खडीकरणाचे काम मागील एक वर्षापासून अपूर्ण आहे. सदर काम त्वरित पूर्ण करण्यात यावेत असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्या आधारावर सडक/अर्जुनी तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींनी ग्रामपंचायत स्तरावर रॉयल्टी करीता प्रक्रिया केली. तहसीलदाराने रॉयल्टकरीता पत्र देवून रॉयल्टीच्या पैशाचा त्वरित भरणा करून रॉयल्टी घ्यावी असे म्हटले. परंतु मग्रारोहयोचा निधी काम होण्यापूर्वी देता येत नाही. म्हणून खंड विकास अधिकाऱ्यांनी निधी दिला नाही. यासाठी खंड विकास अधिकाऱ्यांनी वर्षभर टाळाटाळ केली. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी प्रलंबित असलेली कामे निकाली काढा अशी सूचना दिल्यावर खंड विकास अधिकाऱ्यांनी ५ जून २०१४ रोजी उपजिल्हाधिकारी रोहयो यांच्याकडे मग्रारोहयोचा पैसा रॉयल्टीसाठी वापरता येईल किंवा नाही याचे मार्गदर्शन मागीतले. परंतु एक महिन्याचा कालावधी लोटूनही उपजिल्हाधिकारी रोहयो यांनी या खंडविकास अधिकाऱ्यांच्या पत्रावर मार्गदर्शन केले नाही. परिणामी सडक अर्जुनी तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीची कामे ठप्प पडून आहेत. दोन खनीजाकरिता ग्रामपंचायत राजगुडा या ग्रामपंचायतीला २४० ब्रास मुरुमाची गरज आहे. यासाठी शासनाला ४८ हजार ५५० रुपयांची रॉयल्टी भरावी लागणार आहे. हेटी या ग्रामपंचायतीला १९५ ब्रास मुरुमाची गरज आहे. यासाठी शासनाला ३९ हजार ६०० रुपयांची रॉयल्टी भरावी लागणार आहे. डुंडा या ग्रामपंचायतीला २२० ब्रास मुरुमाची गरज आहे. यासाठी शासनाला ४४ हजार ६०० रुपयांची रॉयल्टी भरावी लागणार आहे. गोंगले या ग्रामपंचायतीला २२० ब्रास मुरुमाची गरज आहे. यासाठी शासनाला ४४ हजार ७०० रुपयांची रॉयल्टी भरावी लागणार आहे. शेंडा या ग्रामपंचायतीला २२० ब्रास मुरुमाची गरज आहे. यासाठी शासनाला ४४ हजार ६०० रुपयांची रॉयल्टी भरावी लागणार आहे. कोयलारी या ग्रामपंचायतीला १५० ब्रास मुरुमाची गरज आहे. यासाठी शासनाला ३० हजार ७०० रुपयांची रॉयल्टी भरावी लागणार आहे. चिखली या ग्रामपंचायतीला ३७७ ब्रास मुरुमाची गरज आहे. यासाठी शासनाला ७६ हजार १०० रुपयांची रॉयल्टी भरावी लागणार आहे. सावंगी या ग्रामपंचायतीला ९०० ब्रास मुरुमाची गरज आहे. यासाठी शासनाला १ लाख ४० हजार ५५० रुपयांची रॉयल्टी भरावी लागणार आहे. कन्हारपायली या ग्रामपंचायतीला १०० ब्रास मुरुमाची गरज आहे. यासाठी शासनाला २० हजार ६०० रुपयांची रॉयल्टी भरावी लागणार आहे. बाम्हणी/सडक या ग्रामपंचायतीला १०० ब्रास मुरुमाची गरज आहे. यासाठी शासनाला २० हजार ७०० रुपयांची रॉयल्टी भरावी लागणार आहे. भुसारीटोला या ग्रामपंचायतीला २०० ब्रास मुरुमाची गरज आहे. यासाठी शासनाला २० हजार ७०० रुपयांची रॉयल्टी भरावी लागणार आहे. पळसगाव या ग्रामपंचायतीला २०० ब्रास मुरुमाची गरज आहे. यासाठी शासनाला २० हजार ६०० रुपयांची रॉयल्टी भरावी लागणार आहे. कोकणा/जमि. या ग्रामपंचायतीला २२० ब्रास मुरुमाची गरज आहे. यासाठी शासनाला ४४हजार ९०० रुपयांची रॉयल्टी भरावी लागणार आहे. पाटेकुर्रा या ग्रा.पं.ला १५० ब्रास मुरुमाची गरज आहे. यासाठी शासनाला ३० हजार ६०० रुपयांची रॉयल्टी भरावी लागणार आहे. कोसमतोंडी या ग्रा.पं.ला २४० ब्रास मुरुमाची गरज आहे. यासाठी शासनाला ४८ हजार ६०० रुपयांची रॉयल्टी भरावी लागणार आहे. म्हसवाणी या ग्रामपंचायतीला ३०० ब्रास मुरुमाची गरज आहे. यासाठी शासनाला ६० हजार ६०० रुपयांची रॉयल्टी भरावी लागणार आहे. दोडके/जांभळी या ग्रामपंचायतीला १०० ब्रास मुरुमाची गरज आहे. यासाठी शासनाला २० हजार ६०० रुपयांची रॉयल्टी भरावी लागणार आहे. रेंगेपार/पांढरी या ग्रा.पं.ला ३५० ब्रास मुरुमाची गरज आहे. यासाठी शासनाला ७० हजार ६०० रुपयांची रॉयल्टी भरावी लागणार आहे. घटेगाव या ग्रा.पं.ला ४०० ब्रास मुरुमाची गरज आहे. यासाठी शासनाला ८० हजार ६०० रुपयांची रॉयल्टी भरावी लागणार आहे. धानोरी या ग्रामपंचायतीला १०० ब्रास मुरुमाची गरज आहे. यासाठी शासनाला २० हजार ७०० रुपयांची रॉयल्टी भरावी लागणार आहे. पांढरी या ग्रामपंचायतीला २०० ब्रास मुरुमाची गरज आहे. यासाठी शासनाला ४० हजार ६५० रुपयांची रॉयल्टी भरावी लागणार आहे. गोपालटोली या ग्रामपंचायतीला १३० ब्रास मुरुमाची गरज आहे. यासाठी शासनाला २६ हजार ५५० रुपयांची रॉयल्टी भरावी लागणार आहे. सितेपार या ग्रा.पं.ला १५० ब्रास मुरुमाची गरज आहे. यासाठी शासनाला ३० हजार ६०० रुपयांची रॉयल्टी भरावी लागणार आहे. कोहळीटोला/आदर्श या ग्रा.पं.ला ७० ब्रास मुरुमाची गरज आहे. यासाठी शासनाला १४ हजार ७०० रुपयांची रॉयल्टी भरावी लागणार आहे. परंतु रॉयल्टीचा पैसा कुठून द्यावा या पेचात अधिकारी अडकले आहेत. अधिकाऱ्यांनी ठोस निर्णय न घेतल्यामुळे सडक/अर्जुनी तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीचे काम वर्षभरापासून रखडले आहे. यासंदर्भात आठ दिवसात निर्णय न झाल्यास तिव्र आंदोलन करू असा इशारा तरोणे यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)