शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

प्रफुल्ल पटेलांनी पाळला दिलेला शब्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:28 IST

गोंदिया : गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. परिणामी या दोन्ही जिल्ह्यांत रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा ...

गोंदिया : गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. परिणामी या दोन्ही जिल्ह्यांत रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. हीच बाब लक्षात घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी त्वरित कॅडिला कंपनीच्या व्यवस्थापकांशी चर्चा करून रेमडेसिविर इंजेक्शनचा स्टॉक उपलब्ध करून देण्यास सांगितले. त्यानंतर दोन्ही जिल्ह्यांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन शनिवारी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार असून खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिलेला शब्द पाळला.

संपूर्ण राज्यात सध्या कोरोनाचा उद्रेक झाल्याने बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने त्यांच्यावर उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शनची गरज आहे. एकाच वेळी या इंजेक्शनची मागणी वाढल्याने सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे. गोंदिया आणि भंडार जिल्ह्यातसुद्धा रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असून त्याची अतिरिक्त दराने विक्री केली जात असल्याची चर्चा आहे. परिणामी गोरगरीब आणि सामान्य रुग्णांची परवड होत आहे. हीच बाब लक्षात घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी कॅडिला कंपनीच्या व्यवस्थापकांशी चर्चा करून रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यास सांगितले. त्यानंतर या कंपनीने दोन्ही जिल्ह्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहे. विशेष म्हणजे माजी आ. राजेंद्र जैन यांनीसुद्धा जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असल्याची बाब खा. प्रफुल्ल पटेल यांच्या लक्षात आणून दिली होती. तसेच या इंजेक्शनचा साठा उपलब्ध व्हावा यासाठी ते माजी आ. राजेंद्र जैन हेसुद्धा सातत्याने प्रयत्नरत होते. दोन शुक्रवारी (दि.१६) पालकमंत्री नवाब मलिक हे जिल्ह्याचे दौऱ्यावर आले असता खा. प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्यांसाठी २ हजार रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला होता. तो शब्द पाळत दोन्ही जिल्ह्यांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहे. यापैकी १ हजार इंजेक्शन गोंदिया व १ हजार इंजेक्शन भंडारा जिल्ह्यासाठी देण्यात येणार आहेत.

........

निर्धारित दरानेच होणार पुरवठा

गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील सर्व मेडिकलमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले असून त्याची शासनाने निर्धारित केलेल्या दरानेच ग्राहकांना विक्री करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्राहकांनासुद्धा अतिरिक्त पैसे मोजावे लागणार नसल्याचे माजी आ. राजेंद्र जैन यांनी सांगितले.