लोकमत न्यूज नेटवर्ककालीमाटी : सरकारटोला येथे जि.प. पूर्व माध्यमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. यात गावातील महिलांचीही कबड्डी स्पर्धा घेण्यात आली.उद्घाटन शाळा समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज वालदे यांच्या हस्ते, सरपंच उमाशंकर मानकर यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. पाहुणे म्हणून उपसरपंच देवकुमार मेश्राम, मुख्याध्यापक मयूर राठोड, शाळा समितीचे सदस्य मधुकर मानकर, उपाध्यक्ष सुनिता सोनवाने, माला मेश्राम, तारेंद्र रामटेके, किशोर रहांगडाले व बक्षीस वितरक म्हणून दुलीचंद शहारे, नेतराम मानकर, नरेंद्र कापसे प्रामुख्याने उपस्थित होते.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला माल्यार्पण कार्यक्रमाची सुरूवात झाली. प्रास्ताविक मयूर राठोड यांनी मांडले. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक, बौद्धीक, शारीरिक स्पर्धांमध्ये भाग घेतला. गावातील महिलांची कबड्डी स्पर्धा घेण्यात आली. तसेच चमचा गोळी, स्मार्ट सूनबाई, चालता बोलता, संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा, बॅटमिंटन, तसेच इतर सामाजिक व स्वच्छतेविषयक उपक्रम राबविण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.संचालन आर.टी. बहेकार यांनी केले. आभार पृथ्वीराज वालदे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रल्हाद मेश्राम, संतोष पारधी, यू.जी. हटवार, के.बी. बिसेन, आर.टी. बहेकार, बी.बी. मेश्राम, नितू पवार, भास्कर मानकर, आकाश रहांगडाले व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी सहकार्य केले.
महिलांची कबड्डी स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 21:37 IST
सरकारटोला येथे जि.प. पूर्व माध्यमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. यात गावातील महिलांचीही कबड्डी स्पर्धा घेण्यात आली.
महिलांची कबड्डी स्पर्धा
ठळक मुद्देगावातील महिलांचीही कबड्डी स्पर्धा