शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

महिला कुटुंबाच्या केंद्रबिंदू ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:18 IST

गोंदिया : महिला या कुटुंबाचा केंद्रबिंदू आहेत. मात्र त्यांच्याच प्रकृतीकडे नेहमीच दुर्लक्ष होते. ह बाब गंभीर असून, यासाठीच आता ...

गोंदिया : महिला या कुटुंबाचा केंद्रबिंदू आहेत. मात्र त्यांच्याच प्रकृतीकडे नेहमीच दुर्लक्ष होते. ह बाब गंभीर असून, यासाठीच आता विशेष करून महिलांचे मोफत सर्वरोग स्क्रिनिंग व मोफत उपचार महिला रुग्णालयातून केले जातील, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी सांगितले.

राष्ट्रीय माता बाल संगोपन कार्यक्रमाअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने गुरुवारी (दि.२२) बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालयात आयोजित चाळिशी पार महिलांची पॅप्स स्मेअर तपासणी व गर्भवतींच्या मोफत तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेशचंद्र तिरपुडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरिष मोहबे, महिला आरोग्य अभियानच्या संयोजिका डॉ. सुवर्णा हुबेकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. गरीमा बग्गा, प्रा. सावंत, प्रा. जुही पुरी, गंगाबाई रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सागर सोनारे, सामाजिक कार्यकर्ता सुनील केलनका, संजय कुलकर्णी, गोल्डी गावंडे, पुरुषोत्तम ठाकरे, पलाश लालवानी, अभय अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते.

भगवान धन्वंतरींच्या छायाचित्रापुढे दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्‌घाटन डॉ. कापसे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. तिरपुडे यांनी, कोविडमुळे मागील दीड वर्षापासून चाळिशी पार महिलांच्या गर्भपिशवीच्या शस्त्रक्रिया थांबलेला होत्या; पण आता बीजीडब्ल्यूमध्ये निष्णात स्त्रीरोग सर्जनच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनाअंतर्गत गर्भपिशवी ऑपरेशन सुरू झाले असून, त्याचा लाभ घ्यावा, असे सांगितले. डॉ. मोहबे यांनी, बऱ्याच दिवसांपासून नॉनकोविड रुग्णांच्या आरोग्य तपासणीला अडथळे येत होते. परंतु आता या कॅम्पच्या माध्यमातून सर्व वयोगटातील महिलांनी रक्तदाब, शुगर, थायराॅईड आदी सर्व मोफत तपासण्या करून उपचार करून घ्याव्या, असे सांगितले.

-----------------------------------------

४३२ महिलांची आरोग्य तपासणी

या शिबिरात डॉ. बग्गा, डॉ. हुबेकर, डॉ. सावंत, डॉ. सोनारे, डॉ. पुरी यांच्या नेतृत्वात ४३२ महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना गोळ्या, औषधे डॉ. तिरपुडे यांच्या सौजन्याने देण्यात आली. याप्रसंगी डॉ. तिरपुडे यांनी, गंगाबाई रुग्णालयातून पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचा महिलांनी लाभ घेऊन निरोगी राहावे, असे आवाहन केले.