शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महसूल सप्ताहात महिला जागृती

By admin | Updated: August 18, 2016 00:32 IST

शासनाच्या वतीने महाराजस्व अभियानांतर्गत १ ते ७ आॅगस्टपर्यंत महसूल आठवडा राबविण्यात आला.

महाराजस्व अभियान : शासनाच्या विविध योजनांची माहिती आमगाव : शासनाच्या वतीने महाराजस्व अभियानांतर्गत १ ते ७ आॅगस्टपर्यंत महसूल आठवडा राबविण्यात आला. यात महिला खातेदारांसाठी गावपातळीवर डी.फॉर्म. कॉलेज रिसामा येथे महिला मेळावा घेण्यात आला. त्यात शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. उद्घाटन जि.प. अध्यक्ष उषा मेंढे यांच्या हस्ते, पं.स. सभापती हेमलता डोये यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून तहसीलदार साहेबराव राठोड, नायब तहसीलदार एस.जी. पवार, तालुका कृषी अधिकारी धरमशहारे उपस्थित होते. तहसीलदार साहेबराव राठोड यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी व उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली चारही महसूल मंडळात गावपातळीवर मेळावे घेतले. त्यात महिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी व त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे तहसीलदार राठोड यांनी सांगितले. या महिला मेळाव्यात लक्ष्मीमुक्ती योजनेद्वारे गाव नमूना, सातबारामध्ये सहहिस्सेदार म्हणून पत्नीच्या नावाची नोंद करणे, बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान, माझी कन्या भाग्यश्री योजना, महिला वारसांची नावे, कब्जेदार सदरी दाखल करणे, हक्कमोड, महिलांचे कायदेशीर हक्क, दारूबंदी, हुंडाबंदी, महिला अत्याचार प्रतिबंध, संजय गांधी निराधार योजना, महिला खातेदारांच्या वहिवाट रस्त्यांच्या अडचणी, रोजगार हमी योजना, शिधापत्रिका, मतदार यादी, आधार जॉबकार्ड, विविध दाखले, प्रधानमंत्री पीक विमा योजना, स्व. गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजना, तसेच सातबारा, गट अ, वारसांचे फेरफार, शिधापत्रिका, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे धनादेश, विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर, डोमिसाईल, उत्पन्नाचे दाखले, आम आदमी विमा योजना व लक्ष्मीमुक्ती योजनेचे अर्ज वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी मंडळ अधिकारी डी.एम. मेश्राम, कठाणे, तलाठी के.एम. पटले, एम.डी. कोहपरे, एन.एन. दंडाळे, एस.एस. पाटील, एस.डी. बोबडे, घायवट, कर्मचारी मारबते, रहांगडाले, आर.बी. राऊत, शिपाई दिगंबर खुणे व कोतवाल यांनी सहकार्य केले. संचालन डी.एम. मेश्राम यांनी केले. आभार एम.आर. केंद्रे यांनी मानले. शेवटी आठवडाभरात प्रत्येक मंडळाच्या गावात होणाऱ्या कार्यक्रमांचा लाभ महिला खातेदारांनी घेण्याचे आवाहन तहसीलदार साहेबराव राठोड यांनी केले.(तालुका प्रतिनिधी)