शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

चार पं.स.च्या सभापतिपदी होणार महिला विराजमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 05:00 IST

जिल्हाधिकारी नयना गुंडे, उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे व राजकीय पक्षाच्या सदस्यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील आठही पंचायत समिती सभापतिपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील २७ टक्के ओबीसी आरक्षण रद्द केले. त्यामुळेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊन तीन महिन्यांच्या कालावधीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुका घेण्यात आल्या नव्हत्या. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  जिल्ह्यातील आठही पंचायत समिती सभापतिपदाची आरक्षण सोडत मंगळवारी (दि. १९) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आली. यात अर्जुनी मोरगाव, देवरी, तिरोडा, सडक अर्जुनी या चारही पंचायत समिती सभापतिपदाची सोडत सर्वसाधारण महिला निघाली. त्यामुळे या चार पंचायत समितीत सभापतिपदी प्रत्येकी अडीच वर्षांसाठी महिला विराजमान होणार आहेत. जिल्हाधिकारी नयना गुंडे, उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे व राजकीय पक्षाच्या सदस्यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील आठही पंचायत समिती सभापतिपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील २७ टक्के ओबीसी आरक्षण रद्द केले. त्यामुळेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊन तीन महिन्यांच्या कालावधीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुका घेण्यात आल्या नव्हत्या. ग्रामविकास मंत्रालयाच्या १२ एप्रिलच्या पत्रानंतर या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळेच जिल्हा निवडणूक विभागाने मंगळवारी जिल्ह्यातील आठही पंचायत समिती सभापतिपदासाठी आरक्षण सोडत काढली. या आरक्षण सोडतीनंतर आता जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतिपदासाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

देवरी व तिरोड्यात इच्छुकांचा हिरमोड  पंचायत समिती सभापतिपदाच्या आरक्षणाला घेऊन मागील तीन महिन्यांपासून निवडून आलेल्या सदस्यांच्या नजरा लागल्या होत्या. तर काही सदस्य सभापतिपदी आपलीच वर्णी लागणार, असे सांगत होते. मात्र, देवरी आणि तिरोडा पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण महिला झाल्याने अनेक इच्छुक सदस्यांचा हिरमोड झाला आहे. 

कुणाची वर्णी लागणार ? पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. सभापतिपदी नेमकी कुणाची वर्णी लावायची? हे ठरविताना नेत्यांचा चांगलाच कस लागणार आहे. यावेळी निवडून आलेले बहुतेक सदस्य हे प्रथमच निवडून आले आहेत. त्यामुळे पक्ष नेमका कोणता निकष लावून निवड करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

जि.प. अध्यक्ष निवडीच्या हालचालींना वेग - जिल्हा परिषद अध्यक्षाची निवडणूकही मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.

 

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीElectionनिवडणूक