शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

महिला परत वळल्या चुलीकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:55 IST

केशोरी : चुलीवर स्वयंपाक केल्यामुळे निघणाऱ्या धुराने महिलांमध्ये डोळ्यांचे आजार बळावले होते. त्याचबरोबर चूल पेटविण्यासाठी लागणाऱ्या लाकडांमुळे जंगल तोडीचे ...

केशोरी : चुलीवर स्वयंपाक केल्यामुळे निघणाऱ्या धुराने महिलांमध्ये डोळ्यांचे आजार बळावले होते. त्याचबरोबर चूल पेटविण्यासाठी लागणाऱ्या लाकडांमुळे जंगल तोडीचे प्रमाण वाढले होते. महिलांचे आजार आणि वृक्षतोड थांबविण्यासाठी केंद्र शासनाने उज्वला गॅस योजना कार्यान्वित करून या परिसरातील खेड्या-पाड्यात मोफत गॅस सिलिंडर वितरित करून योजनेचा गवगवा केला. परंतु आता गॅसच्या वाढत्या किमतीमुळे महिला कंटाळल्या असून, त्या परत सरपणासाठी लागणाऱ्या काड्या जंगलातून तोडून चुली पेटविण्याकडे वळल्याचे दिसून येत आहे.

वृक्षतोडीवर आळा बसावा आणि महिलांना चुलीच्या धुरामुळे उद्‌भवाऱ्या आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून केंद्र शासनाने उज्वला गॅस योजना कार्यान्वित केली. याअंतर्गत या भागातील खेड्या-पाड्यात मोफत गॅस सिलिंडरचे मोठ्या प्रमाणात वितरण करून महिलांना दिलासा दिला होता. परंतु अलीकडे वेळोवेळी गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे गरीब कुटुंबातील महिला धास्तावल्या आहेत. सिलिंडरची किंमत सध्या ८३९ रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे उज्वला योजेनेच तीनतेरा वाजले असून, आदिवासी महिलांकडे गॅस सिलिंडर उपलब्ध असूनही त्यांनी जंगलातील सरपण जमा करून चुली पेटवायला सुरुवात केली आहे. चुलीतून निघणाऱ्या धुरामुळे महिलांना डोळ्यांचे विविध आजार होण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्याचबरोबर वृक्षतोडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

हा भाग जंगलवेष्ठीत असून, उज्वला गॅस योजनेंतर्गत या भागातील गावागावांत मोफत गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले आहे. परंतु वाढलेल्या गॅसच्या किमतीमुळे गरीब कुटुबांना गॅस पेटविणे परवडणारे नाही. रोज मजुरी करणाऱ्या कुटुंबांन ते अवघड आहे. यामुळे जंगल तोडीचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किमतीमुळे महिला वर्गातून शासनाप्रती संताप व्यक्त केला जात आहे.