शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात साकारणार महिला प्रशिक्षण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 22:31 IST

काँग्रेस पक्षाने गोंदिया जिल्हा परिषदेसारख्या महत्वपूर्ण स्वराज्य संस्थेत रजनी नागपुरे, उषा मेंढे व आता सीमा मडावी यांच्या रूपाने महिला नेतृत्वाला समोर आणण्याचे काम केले आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : जिल्हास्तरीय महिला मेळावा

आॅनलाईन लोकमतगोंदिया : काँग्रेस पक्षाने गोंदिया जिल्हा परिषदेसारख्या महत्वपूर्ण स्वराज्य संस्थेत रजनी नागपुरे, उषा मेंढे व आता सीमा मडावी यांच्या रूपाने महिला नेतृत्वाला समोर आणण्याचे काम केले आहे. यातून काँग्रेस पक्ष महिला सशक्तीकरणासाठी किती गंभीर आहे, याची प्रचिती येते. जिल्ह्यात महिलांशी संबंधित महिला आर्थिक विकास महामंडळासाठी भव्य प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम जयस्तंभ चौकातील वन विभागाच्या कार्यालयाच्या ठिकाणी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी येथे सांगितले.जि.प. महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय महिला मेळावा घेण्यात आला. मेळाव्याच्या उद्घाटकीय भाषणातून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजकुमार बडोले होते. अतिथी म्हणून जि.प. अध्यक्ष सीमा मडावी, माजी जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. राजा दयानिधी उपस्थित होते.आ. अग्रवाल म्हणाले, भारताच्या इतिहासात अनेक महिलांनी देशाचे नाव मोठे केले. स्वतंत्र भारतात काँग्रेस सरकारने महिलांच्या उत्थानासाठी निरंतर नवनवीन योजनांना लागू केले. त्यामुळे महिलांनी घराबाहेर निघून शासकीय व राजकीय क्षेत्रात आपली पकड मजबूत करणे सुरू केले. जुन्या संस्कृतीमुळे महिला घराबाहेर निघू शकत नव्हत्या. मात्र काँग्रेस सरकारच्या धोरणांमुळे आज राष्टÑपती पदापर्यंत महिला पोहोचली. देशाची प्रथम महिला पंतप्रधान सुध्दा काँग्रेस सरकारनेच दिले. भारतरत्न इंदिरा गांधी सारख्या लोहमहिलेचे नेतृत्व भारताला लाभले. चारवेळा भारत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान पदाला नवीन ओळख दिली. आज सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक व क्रीडा यासारख्या क्षेत्रात महिलांचा वर्चस्व वाढला आहे, यामागे मागील ७० वर्षात काँग्रेस सरकारच्या धोरणांचे मोठे योगदान आहे, असे ते म्हणाले.आपल्या मार्गदर्शनात पालकमंत्री बडोले म्हणाले, महाराष्टÑ शासन संपूर्ण राज्यात महिलांच्या उत्थानासाठी कार्य करीत आहे. गोंदिया जिल्ह्यात आमदार अग्रवाल यांचा सतत पाठपुरावा व तीव्र ईच्छाशक्तीमुळे असे रचनात्मक आयोजन सुगमतेने होत आहेत, असे सांगितले.जि.प. अध्यक्ष सीमा मडावी यांनी महिला सक्षमीकरण व महिला उत्थान यावर मार्गदर्शन केले. महिला व बाल कल्याण सभापती लता दोनोडे यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून आत्मनिर्भर होत असल्याचे सांगितले. तसेच पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे यांनी, महिलांना स्वयंरोजगार देवून आत्मनिर्भर बनविण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.