शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

रोवा वं बाई रोवण्या रोवा.. संध्याकाळी पाटलाघरच्या घुगऱ्या खावा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 15:51 IST

रोवणी करणे म्हणजे शेतकरी वर्गाचा एक सण असतो, कारण रोवणी करतांना धुरे-पारा मारणे, कोंटे काढणे, पुरुषांचे काम पऱ्हे काढणे, रोवणीच्या बांधीत नांगर व ट्रक्टरच्या सहाय्याने चिखल करणे तरच रोवणीची तयारी पूर्ण होते.

ठळक मुद्देलोककला परंपरागत रोवणी बहरल्या...कथा,गीत व चुकटूले, मजूर रंगले आनंदात

मुन्नाभाई नंदागवळीलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: पूर्वीच्या काळात आणि आताच्या काळात फार तफावत दिसते, पण शेती करतांना मात्र परंपरा न विसरता लोककला जोपासत आजही कथा, गीत व चुटकूले सादर करुन मोठ्या आनंदाने रोवणी बहरल्या आहेत.रोवणी करणे म्हणजे शेतकरी वर्गाचा एक सण असतो, कारण रोवणी करतांना धुरे-पारा मारणे, कोंटे काढणे, पुरुषांचे काम प-हे काढणे, रोवणीच्या बांधीत नांगर व ट्रक्टरच्या सहाय्याने चिखल करणे तरच रोवणीची तयारी पूर्ण होते.मग जुन्या पिढीच्या वयस्क स्त्रिया मंडळी गाण्याच्या तालावर, रोमांचकारी राजा-राणीच्या पौराणिक, सामाजिक कथेच्या मांडणीद्वारे, हास्याचा कल्लोळ करणारे चुटकूले सादरीकरणातून रोवणीला बळ मिळते, रोवणीचा वेग वाढतो.रोवा व बाई रोवणा रोवा,संध्याकाळी पाटलाच्या घरच्याघुग-या खावा ...

अशी झाडीपट्टीतील रोवणीची गाणी प्रसिध्द आहेत. सर्वच स्त्रिया एका सरळ रेषेत उभ्या राहून रोवणीला सुरूवात करतात. रोवणी हा आनंदाचा सोहळा मजूर वर्ग शेतात फुलवतात.शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, पण अनेक अडचणी, समस्यांचा सामना करत आपले शेत राखतो, शेतात धानपिक लावतो अशातच रोवणीची मजा काही वेगळीच असते अनुभवणा-यांना तर न्यारीच...रोवणीत वणकर, फणकर, नांग-या यांचा संगनमत साधून रोवण्या बहारदार करतात, शेवटच्या दिवशी तर रोवणी संपली की परंपरेने चिखल-माती खेळ खेळतात, रोवणीची पुजा करतात, एकमेकांना चिखल लावतात,डफळीचा बाजा करुन शेतातून रॅली काढतात घरापर्यंत बैलाच्या जोडीला समोर करुन मागे मागे मजूर वर्ग गाणी म्हणत येत असतो, शेतकरी घरी आल्यावर भिंतीवर चिखलाने माणसांचे चित्र काढतात ही ओळख असते रोवणी संपूर्ण झाल्याची.अशा प्रकारे आजही लोककला परंपरागत रोवणी परिसराच्या येरंडी बाराभाटी बोळदे कवठा डोंगरगाव देवलगाव सुकळी आदी गावात बहरल्याचे चित्र पाहावयास मिळते.

टॅग्स :agricultureशेती