शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 01:02 IST

महिला आर्थिक विकास महामंडळ बचतगटाच्या माध्यमातून महिलांना विकासाच्या प्रवाहात आणीत आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे माविमच्या माध्यमातून महिलांनी आर्थिकदृष्टया सक्षम व्हावे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणार, विविध योजनांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महिला आर्थिक विकास महामंडळ बचतगटाच्या माध्यमातून महिलांना विकासाच्या प्रवाहात आणीत आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे माविमच्या माध्यमातून महिलांनी आर्थिकदृष्टया सक्षम व्हावे. असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी येथे केले.शनिवारी येथील जलाराम लॉन येथे आयोजित महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा योजना समन्वय समिती आणि नियोजन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया तालुक्यातील माविमच्या बचतगटातील महिलांसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्षा सीमा मडावी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. शिक्षण व आरोग्य समिती सभापती रमेश अंबुले, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवाने, महिला व बालकल्याण समिती सभापती लता दोनोडे, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, जि.प.सदस्य रजनी गौतम, नगरसेविका भावना कदम, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक दिलीप सिल्लारे, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रभारी व्यवस्थापक बी.एम.शिवणकर, कृषी विज्ञान केंद्र हिवराचे कार्यक्र म व्यवस्थापक डॉ. नरेंद्र देशमुख, तहसीलदार टी.आर.भंडारी, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सविता बेदरकर, राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक रजनी रामटेके उपस्थिती होत्या.अग्रवाल म्हणाले, महिला आर्थिक विकास महामंडळ बचतगटाच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर करुन त्यांना सक्षम करण्याचे काम करीत आहे. महिला या कर्जाची परतफेड प्रामाणकिपणे करतात. बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तुला विक्री केंद्रासाठी एक चांगला मॉल तयार करण्याच्या दृष्टीने माविमची स्वतंत्र इमारत तयार व्हावी. तसेच महिला बचतगटाने उत्पादीत केलेल्या वस्तुला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यास आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक सिल्हारे, उपविभागीय अधिकारी वालस्कर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या वेळी प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत बँक आॅफ महाराष्ट्र, बँक आॅफ बडोदा व बँक आॅफ इंडिया मार्फत बचतगटाच्या २० माहिलांना कर्ज प्रकरणाचे मंजुरीपत्राचे वाटप करण्यात आले. उपस्थित अन्य मान्यवरांनी या वेळी महिलांना मार्गदर्शन केले. या वेळी ‘उडाण उत्कर्षाची’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यशस्वीतेसाठी सनियंत्रण अधिकारी प्रदीप कुकडकर, लेखाधिकारी योगेश वैरागडे, सहायक प्रफुल्ल अवघड, एकांत वरघने, प्रिया बेलेकर व महिला बचतगटाच्या सहयोगिनी यांनी सहकार्य केले.उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांचा गौरवगाव निर्मल करण्यात मोलाचे सहकार्य केल्याबद्दल उत्कृष्ट ग्रामसंस्था म्हणून इंदिरा ग्रामसंस्था एकोडी, जिज्ञासा ग्रामसंस्था सेजगावच्या पदाधिकारी व सदस्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.पैकनटोलीला ५० हजारांचा निधीदीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानअंतर्गत सुप्रभात वस्तीस्तरीय संघ पैकनटोली यांना फिरता निधी म्हणून ५० हजार रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. तसेच उज्वला गॅस योजनेअंतर्गत ५ महिलांना गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल