शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून उद्योगाकडे घेतली धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:49 IST

बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगाराचे साधन निर्माण झाले आहे. बचत गट फक्त गटच बनून राहिले नाही तर महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून लघू व कुटीर उद्योगाकडे धाव घेतली आहे, .....

ठळक मुद्देप्रथम वार्षिक सभेची सांगता : हजारो महिलांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगाराचे साधन निर्माण झाले आहे. बचत गट फक्त गटच बनून राहिले नाही तर महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून लघू व कुटीर उद्योगाकडे धाव घेतली आहे, असे प्रतिपादन माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी सुनील सोसे यांनी केले.हलबीटोला येथे अर्धनारेश्वरालय येथे महिला सभा घेण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया-महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जयसेवा लोकसंचालिका साधन केंद्र पिपरीयाद्वारे प्रथम वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. कार्यक्रमाला प्रामुख्याने नगराध्यक्ष विरेंद्र उईके, विलास सुरंदर मुंबई, राजगिरे, जि.प. सदस्या दुर्गा तिराले, पं.स. सदस्य भरत लिल्हारे, न.प. उपाध्यक्ष प्रल्हाद वाढई, अर्धनारेश्वरालय ट्रस्ट अध्यक्ष गोविंदराम वरकडे, एम.ई. टेंभरे, आर.एम. वराडपांडे, एलडीसी कोरे, शालू साखरे उपस्थित होते.कार्यक्रमात सर्व महिलांना जीवनोपयोगी मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले. मुद्रा लोन, शेळी पालन, व्यावसायिक उद्योग धंदे यावर सविस्तर माहिती देण्यात आली. शिवशक्ती ग्रामसंस्था हलबीटोला येथील प्रथम दर्शनिय बोर्डाचे अनावरण व गौण वनोपज खरेदी केंद्राची सुरूवात सुद्धा करण्यात आली. कार्यक्रमात सर्व महिलांच्या आरोग्य सेवेसाठी एचबी कॅम्प घेण्यात आले. विविध उद्योजक स्टॉल्स लावण्यात आले. माहिती सांगण्यात आली. तसेच सीएमआरसी पुस्तकाचे सुद्धा मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. बचत गटाच्या महिलांनी नृत्य सादर करुन शिक्षण व जागरुकता यावर माहिती सादर केली.संचालन ललीता वडगाये यांनी केले. प्रास्ताविक अली सय्यद यांनी मांडले. आभार करंडे यांनी मानले.