डपक्यांची होळी : महिला समिती व गावकऱ्यांचा पुढाकारमुंडीकोटा : जवळच असलेल्या इसापूर या गटग्रामपंचायतच्या गावात अनेक दिवसांपासून दारूचा व्यवसाय सुरू होता. याला त्रासून महिलांनी गावात दारूबंदी करण्याचा ठराव गेल्या १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत केला. पण त्यानंतरही दारू विक्रेते व पिणारे ऐकत नसल्याने अखेर महिलांनीच दुर्गावतार धारण करून दारूच्या डबक्या जप्त केल्या. त्यानंतर त्या डपक्यांची होळी करण्यात आली.गावात दररोज सकाळी व संध्याकाळी विकणाऱ्यांची व पिणाऱ्यांची फार गर्दी दिसत होती. जणू काही या गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. गावात दारू काढणे व विकणे हे दोन्ही धंदे सुरू होते. गावाबाहेरील अनेक व्यक्ती दारू पिण्याकरिता येथे येत असत. त्यामुळे अनेकांचे कुटूंब उध्द्वस्त झाले. त्यामुळे ईसापूर व खोपडा या गटग्रामपंचातमध्ये सरपंच व उपसरपंच आणि सदस्यांनी तसेच महिलांनी पुढाकार घेत ग्रा.पं. कार्यालयात स्वातंत्र्यदिनी ग्रामसभा घेतली. त्यात ईसापूर येथील दारूबंदीचा ठराव घेण्यात आला. याचवेळी ग्रामपंचायत कार्यालयात दारूबंदीकरिता महिला समिती गठित करण्यात आली. या महिला समितीच्या वतीने तसेच गावकरी महिला व बचत गटातील महिला यांनी विकणाऱ्यास व पिणाऱ्यास दारूबंदीविषयी सूचना दिली. दारूचा तुमच्याकडे जो साठा आहे तो लवकर विकून मोकळे व्हा, अन्यथा आपल्या विरोधात पोलीस कारवाई करणयात येईल, अशी सूचनासुद्धा दिली. पण दारूविक्रेत्यांनी याकडे दुर्लक्ष केले. शेवटी २६ आॅगस्ट रोजी ईसापूरच्या महिला समितीने व गावकरी महिला व बचत गटातील महिलांनी गावात रॅली काढून ईसापूर गावात सर्वत्र दारूबंदी केली. अनेक दारू काढणाऱ्यांकडील दारूसाठा त्यांचा घरी जावून काढण्यात आला. ती दारू रस्त्यावर फेकण्यात आली. तसेच दारूसाठी वापरण्यात आलेल्या डबक्या पेटवून होळी करण्यात आली. यावेळी सरपंच संतोष बावणकर, उपसरपंच दुर्गा किरपानकर, पोलीस पाटील के.एन.कुंभलकर, तंमुस अध्यक्ष किशोर बावणकर, जितेंद्र साठवणे, सुरेश मोहरकर, दुर्गा कुंभलकर, मोनिका हिरकणे, वणिता वलके, रोजगार सेवक शिवकुमार जगवाळे, शेषराव मरगळे, दारूबंदी महिला समिती अध्यक्ष मंगला भालाधरे, उपाध्यक्ष आशा सहारे, सचिव मंदा किरपानकर, यशोदा बारबैले, संगीता दूधबर्वे, गिता सहारे, गिता डिंकवार, कांता सोनवाने, उर्मिला डहाट, रविकांता पाटील, मामा साठवणे, कविता सहारे तसेच राजू वणवे पोलीस शिपाई उपस्थित होते. (वार्ताहर)
दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी महिला रस्त्यावर
By admin | Updated: August 28, 2015 01:44 IST