शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
5
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
6
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
7
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
8
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
9
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
10
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
11
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
12
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
13
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
14
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
15
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
16
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
17
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
18
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
19
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
20
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?

बस अपघातात महिला ठार

By admin | Updated: September 23, 2016 02:01 IST

येथील गोंदिया- कोहमारा मार्गावरील हिरडामाली पेट्रोल पंपाजवळ गोंदिया आगाराच्या एस.टी. बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने

स्टेअरिंग रॉड तुटला : हिरडामालीजवळ झाली अनियंत्रितगोरेगाव : येथील गोंदिया- कोहमारा मार्गावरील हिरडामाली पेट्रोल पंपाजवळ गोंदिया आगाराच्या एस.टी. बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात एका वृद्धेला प्राण गमवावे लागले. जसवंता राऊत (६० वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे.प्राप्ती माहितीनुसार, गुरूवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास एचएच २०, डी ९१७५ ही बस गोंदियावरुन गोरेगावमार्गे देवरीकडे जाण्यासाठी निघाली होती. ही बस हिरडामाली पेट्रोल पंपाच्या समोर आली असताना जसवंता राऊत ही महिला बसमध्ये चढण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभी होती. मात्र त्याचवेळी बसचा स्टेअरिग रॉड तुटल्यामुळे बस अनियंत्रित झाली आणि जसवंताला या बसची धडक बसली. तिला काही वेळातच गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान काही वेळातच तिचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे सायंकाळपर्यंत बसचालक लिलाराम हरिणखेडे (४०) यांच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता. (तालुका प्रतिनिधी)महामंडळाच्या बसेस भंगार?राज्य परिवहन महामंडळाच्या एम.एच. २०, डी ९१७५ या बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे हा अपघात झाला. यात जसवंताचा हकनाक बळी गेला. या अपघातामुळे परिवहन महामंडळाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महामंडळाच्या बसगाड्या भंगार होत आहेत की चालकाची चूक होती, याचा तपास होणे गरजेचे आहे. जर बसगाड्या भंगार होण्याच्या मार्गावर असतील तर वेळीच त्या दुरूस्त करणे गरजेचे आहे. अन्यथा पुढेही दुसऱ्या एखाद्या बसला अशाच पद्धतीने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.