शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

माकडांच्या हल्ल्यात महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2017 00:56 IST

साखरीटोला परिसरात पागल झालेल्या माकडांचा कहर सुरुच असून माकडांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : साखरीटोला परिसरात पागल झालेल्या माकडांचा कहर सुरुच असून माकडांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. मात्र वनविभागाचे अधिकारी निद्रावस्थेत आहेत. आतापर्यंत त्या माकडाचा बंदोबस्त करण्यात वनविभाग अपयशी ठरला आहे. अजून किती लोकांना त्या माकडांच्या हल्ल्याला सामोरे जावे लागेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वनविभाग नागरिकांच्या मरणाची वाट पाहत आहे काय? असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे.१८ मे रोजी सलंगटोला येथील मोहपत कुशन मुनेश्वर यांचा माकडाने चावा घेवून गंभीर जखमी केले होते. ते सध्या नागपूरला उपचार घेत आहेत. ही घटना ताजी असतानाच २२ मे रोजी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान साखरीटोला (सातगाव) येथील विठा काशीनाथ दोनोडे (५५) या महिलेला घराच्या मागील भागात अचानक माकडाच्या हल्ल्याचा सामना करावा लागला. झाडू घेवून साफसफाई करीत असताना माकडाने त्यांच्या अंगावर उडी घेवून मानेच्या लचका तोडला व गंभीर जखमी केले. लगेच त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र सातगाव येथे भरती करण्यात आले. येथून त्यांना रेफर टू गोंदिया करण्यात आले. १०८ क्रमांकाच्या गाडीने त्यांना गोंदियाला पुढील उपचाराकरिता नेण्यात आले. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. यापूर्वी सुद्धा हेटीटोला येथील माजी सरपंच प्रमिला बागळे, सलंगटोला येथील पाच ते सहा लोकांना व साखरीटोला येथे तीन ते चार घटना घडल्या. मात्र अजूनही माकडांचा बंदोबस्त विभाग करू शकला नाही व कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई देऊ शकला नाही. यासाठी वनविभागाचे अधिकारी कारणीभूत आहेत. साखरीटोला येथे वनविभागाचे बिट कार्यालय आहे. बरेचदा ते बंद असते. येथील बिटरक्षक एस.जी. बुंदेले हे गोंदियावरुन अपडाऊन करतात. मुख्यालयी ते राहत नाही. त्यामुळे आपल्या बिटकडे दुर्लक्ष असते. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी, अशी मागणी निलकंठ दोनोडे यांनी केली आहे.