शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

रूरल मार्टच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 05:00 IST

सिव्हील लाईन्स परिसरातील राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डच्या सहायाने महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या रूरल मार्टच्या उद्घाटनप्रसंगी बुधवारी (दि.२९) त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदार सहसराम कोरोटे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नीरज जागरे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे प्रामुख्याने उपस्थित होते.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर : माविमच्या रूरल मार्ट, बचत गटाच्या महिलांना रोजगार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्रामीण आणि शहरी भागातील महिला बचत गटांच्या माध्यमातून संघटीत झाल्या आहेत. त्या केवळ संघिटत नाही तर त्यांनी उद्योग-व्यवसाय सुरू केले आहे. बचतगटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी रूरल मार्टच्या माध्यमातून हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. रु लर मार्टच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाला आणखी चालना मिळण्यास मदत झाली असल्याचे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी केले.येथील सिव्हील लाईन्स परिसरातील राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डच्या सहायाने महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या रूरल मार्टच्या उद्घाटनप्रसंगी बुधवारी (दि.२९) त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदार सहसराम कोरोटे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नीरज जागरे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे प्रामुख्याने उपस्थित होते. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राचे पूजन करण्यात आले. पुढे बोलताना ठाकूर यांनी, महिला संघटित झाल्यामुळे त्या वस्तू आणि साहित्याची निर्मिती करू लागल्या आहेत. बचतगटातील महिला भगिनींना बळकट करण्याचे काम महिला व बालविकास विभाग निश्चितपणे करेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच महिलांमध्ये अनेक नवनवीन संकल्पना आहे. त्या प्रत्यक्षात उतरविण्याचे काम महिलांनी करावे, यासाठी त्यांना निश्चितपणे मदत करण्यात येईल. कुटुंबाच्या अर्थकारणात महिलांचा हातभार लागत असल्याचेही त्या म्हणाल्या.रूरल मार्टमध्ये गोंदिया, सालेकसा, तिरोडा, देवरी, आमगाव, गोरेगाव व सडक-अर्जुनी तालुक्यातील ५४ महिला बचतगटांनी तयार केलेल्या ७५ प्रकारच्या विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहे. यामध्ये विविध शोभिवंत लाकडी वस्तू, बांबू आर्ट, गोंडी पेंटिंग, मायक्रोन वस्तू, कापडी बॅग, कापडी मास्क, पायदान, बांगड्या, विविध प्रकारची लोणची,पापड, कुरड्या, चकल्या तसेच विविध प्रकारच्या डाळीं यासह अनेक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.कार्यक्रमासाठी सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, सनियंत्रण अधिकारी प्रदीप कुकडकर, लेखाधिकारी योगेश वैरागडे, जिल्हा उपजीविका व्यवस्थापक हेमंत मेश्राम, राम सोनवणे, प्रफुल अवघड, उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक मोनिता चौधरी तसेच तालुका अभियान कक्ष तिरोडा आणि सालेकसा येथील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.वस्तूंची पाहणी व खरेदीही केलीयाप्रसंगी नामदार ठाकूर यांनी रूरल मार्टमध्ये विक्र ीसाठी उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या वस्तू आणि साहित्याची पाहणी केली. कापडी मास्क तयार करणाºया बचतगटातील महिला तसेच अन्य साहित्य निर्मिती करणाºया महिलांशी त्यांनी संवाद साधला. तसेच काही वस्तूंची खरेदी करून नोंदणी वहीत त्यांनी आपला अभिप्रायही नोंदविला.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर