यांतर्गत, शनिवार (दि.६) वाजता सकाळी ११.३० वाजता बुद्ध विहार समन्वय समिती मुख्य संयोजक अशोक सरस्वती बुद्धविहार संस्कृती निर्मिती आणि बौद्ध समाजात संघटितपणा, बंधुभाव, शिस्त, शील, सदाचारी वृत्ती रुजवण्यासाठी बुद्ध विहार समन्वय समितीची उपयुक्तता, टीम आता लढुया एकीनेचचे अतुल खोब्रागडे विद्यार्थ्यां पुढील आव्हान व त्याचे समाधान, माजी एवियेशन ट्रेनिंग ऑफिसर मंत सुटे परदेशातील उच्च शिक्षण व त्यासाठी समाजातील सगळ्या घटकांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीबद्द्ल माहिती या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. रविवारी (दि.७) ‘समाजाच्या सर्वांगीण विकासामध्ये महिलांची भूमिका’ या विषयावर महिला सशक्तीकरण कार्यशाळ अखिल भारतीय महिला सशक्तीकरण संघाच्या मार्गदर्शनात भदंत श्रद्धाबोधी यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय शिक्षिका पौर्णिमा नागदेवे, शिक्षिका माधुरी भेलावे, अवंतीबाई लोधी महासभेच्या शीला नागपुरे, ओबिसी संघर्ष कृती समितीच्या रिना भोंगाडे, समता सैनिक दलच्या किरण वासनिक, शिक्षिका माधुरी पाटील, पाली भाषा प्रचारक ललिता बोम्बार्डे, मुख्याध्यापीका उमा गजभिये, निलू मोहंती, संध्या बंसोड, किरण मेश्राम यांच्या सहभागाने आयोजित केली आहे. त्यानंतर, भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने विवाहयोग्य युवक-युवती परिचय मेळावा आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे संविधान मैत्री संघ, बुद्धविहार समन्वय समिती, टीम आता लढुया एकिनेच, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, मैत्रीय बुद्ध विहार महिला मंडळ आंबेडकरी चळवळीचे संस्कार केंद्र यांनी कळविले आहे.
महिला सशक्तीकरण व कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा ६ व ७ रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:53 IST