शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
4
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
5
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
6
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
7
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
8
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
9
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
10
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
11
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
12
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
13
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
14
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
15
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
16
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
17
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
18
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
19
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
20
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...

महिलाच बदल घडवून आणू शकतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 10:01 PM

सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी पहिली शाळा काढली. त्यामुळे देशाच्या सर्वोच्च पदापासून अंतराळातही महिलांनी झेप घेतली. पुरुषांपेक्षा महिला सरस असून ग्रामीण भागातही स्वच्छतेच्या बाबतीत महिलाच खऱ्या अर्थाने बदल घडवून आणू शकतात, .....

ठळक मुद्देहमीद अल्ताफ अकबर अली : गणखैरा येथे स्वच्छतामय संक्रांतीचे हळदी-कुंकू उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी पहिली शाळा काढली. त्यामुळे देशाच्या सर्वोच्च पदापासून अंतराळातही महिलांनी झेप घेतली. पुरुषांपेक्षा महिला सरस असून ग्रामीण भागातही स्वच्छतेच्या बाबतीत महिलाच खऱ्या अर्थाने बदल घडवून आणू शकतात, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष हमीद अल्ताफ अकबर अली यांनी केले.गणखैरा येथे स्वच्छतामय संक्रांतीचे हळदीकुंकू व महिला मेळावा या उपक्रमानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.याप्रसंगी प्रामुख्याने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती छाया दसरे, पं.स. सभापती माधुरी टेंभरे, जि.प. सदस्य विश्वजित डोंगरे, रोहिणी वरखडे, गोरेगाव पंचायत समिती सदस्य पुष्पराज जनबंधू, सरपंच धारा तुप्पट, तुमखेडाच्या सरपंच त्रिवेणी शरणागत, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. डी. पारखे, गटविकास अधिकारी डी.बी. हरिणखेडे उपस्थित होते.शौचालयाचे बांधकाम व त्यांचा वापर, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, बाळाच्या विष्ठेचे व्यवस्थापन, मासिक पाळी व्यवस्थापन, गरोदर माता व बालकांचे पोषण आहार आणि प्लास्टीकबंदी संदर्भात जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छतामय संक्रांतीचे हळदीकुंकू उपक्रम राबविण्यात येत आहे.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती छाया दसरे यांनी मुलगा-मुलगी यात भेदाभेद न करण्याचे मत व्यक्त करुन स्वच्छतेच्या उपक्रमांत सर्वांनीच सहभाग घेण्याचे आवाहन केले. महिलांनी एक वस्तू कमी घ्यावी, मात्र शौचालय बनवावे, असे आवाहन पं.स. सभापती माधुरी टेंभरे यांनी केले.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी, कुटुंबाचा केंद्रबिंदू महिला आहेत. आपले घर आपण स्वच्छ ठेवतो. त्याचप्रमाणे आपले गाव सुद्धा स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी पाळली तर संपूर्ण गाव स्वच्छ होईल. लोकांमध्ये जनजागृतीसाठीच जिल्ह्यात स्वच्छतामय संक्रांतीचे हळदीकुंकू हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून प्रेरणा घेवून आणि आपली गरज म्हणून शौचालयाचा वापर करा. इतरांनाही शौचालय वापरण्याची प्रेरणा देण्याचे आवाहन दयानिधी यांनी केले. पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.व्ही राठोड यांनी उपक्रमाची संपूर्ण माहिती देवून शौचालयाच्या सामाजिक गरजेवर तथा त्यातून होणाºया आर्थिक परिणामांवर मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद सदस्य विश्वजित डोंगरे यांनी समयोचित विचार व्यक्त केले.याप्रसंगी ग्रामपंचायतीच्या वतीने अंगणवाडी केंद्राला दूरचित्रवाणी संच भेट देण्यात आले. दरम्यान स्वखर्चातून शौचालयाचे बांधकाम करुन त्याचा वापर करणाºया पूजा प्रीतम पारधी, दीपिका कापसे यांना डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.कार्यक्रमाला माजी सभापती दिलीप चौधरी, चित्रकला चौधरी, आरती चवारे, माजी उपसभापती सुरेंद्र बिसेन, बाल विकास अधिकारी वाघ, उपसरपंच लिखन पारधी, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रास्ताविक अंगणवाडी पर्यवेक्षिका अनिला श्रीवास्तव यांनी मांडले. संचालन मनोज सरोजकर व प्रतिमा पारधी यांनी केले. आभार संतोष परमार यांनी मानले.पतंजलीचा सत्कारमहिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छतामय संक्रांतीचे हळदीकुंकू हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उपक्रमांतर्गत एक लाख ८० हजार महिलांपर्यंत स्वच्छतेच्या संदेशासह पोहोचण्याचा उद्देश आहे. दरम्यान महिलांना सॅनीटरी पॅड व हात धुण्यासाठी साबण वाण म्हणून देण्यात येत आहे. पतंजली समुहाने महिलांना भेट देण्यासाठी मोफत साबन उपलब्ध करुन दिले. त्याबद्दल पतंजली समुहाचे नागपूर येथील व्यवस्थापक सुनील पोगळे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते सत्कार करण्याता आला.