शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दारुबंदी समितीच्या महिलांना सहकार्य नाही

By admin | Updated: June 5, 2017 00:57 IST

ग्रामपंचायत आमगाव खुर्द अंतर्गत संपूर्ण दारुबंदी व्हावी म्हणून येथील महिलांनी मागील दोन-तीन महिन्यांपासून धरणे आंदोलन, निवेदने व सभा आदी अनेक पाऊले उचलली आहेत.

मदतीसाठी दारे ठोठावले : अधिकारी-पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्षलोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : ग्रामपंचायत आमगाव खुर्द अंतर्गत संपूर्ण दारुबंदी व्हावी म्हणून येथील महिलांनी मागील दोन-तीन महिन्यांपासून धरणे आंदोलन, निवेदने व सभा आदी अनेक पाऊले उचलली आहेत. परंतु सदर महिलांचा आवाज कोणीही ऐकायला तयार नसून आपले आंदोलन दाबण्याचा प्रयत्न अधिकारी- पदाधिकाऱ्यांपासून काही समाजकंटकांंसह सर्वच करीत असल्याचा आरोप दारूबंदी महिला समितीने केला आहे. गावात दारूबंदी करण्यासाठी महिलांनी त्या संदर्भाचे निवेदन ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, तहसील कार्यालय, आबकारी विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला सुद्धा अनेकवेळा दिले. परंतु या संदर्भात आतापर्यंत कोणतेही पाऊल संबंधीत विभागाने उचलले नाही. त्यामुळे महिलांमध्ये प्रचंड रोष आहे. गावात दारूबंदी व्हावी की नाही या संदर्भात २६ एप्रिल रोजी ग्राम पंचायत आमगाव खुर्द येथे ग्राम सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु या सभेत रीतसर चर्चा न करता फक्त गोंधळ घालण्याचे काम काही लोकांनी केल्यामुळे महिलांनी पोलीस स्टेशनला धडक दिली होती. त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार यांनी संबंधीत अधिकारी-पदाधिकारी यांना पाचारण करुन पुढे या विषयी व्यवस्थीत ग्राम सभा घेवून दारूबंदीचा विषय मांडण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर ३१ मे रोजी ग्राम सभा घेण्याचे ठरविले होते. त्यानुसार पुन्हा गावातील महिलांनी ग्राम पंचायतला धडक दिली. परंतु त्यांच्या विषय घेण्यात आला नाही. तेव्हा त्यांनी खंडविकास अधिकारी आणि त्यानंतर तहसीलदार यांच्या कार्यालयात जाऊन आपली व्यथा मांडली व निवेदन दिले. यावेळी महिलांनी बीडीओ आणि तहसीलदार यांच्या दालनात जाऊन रोखठोक भाषेत चर्चा केली व आठ दिवसात योग्य कार्यवाही झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला.महिलांची मागणी लक्षात घेता ग्रामपंचायतीने त्या दिशेने रितसर पाऊल उचलून योग्य ती कारवाई केली पाहिजे. पुढे या बाबतीत आवश्यक तो पाठपुरावा करण्याचे आवाहन तहसीलदार प्रशांत सांगळे यांनी दिले.२६ एप्रिलच्या ग्रामसभेत चर्चा न झाल्याने पुढे ३१ मे च्या ग्रामसभेत चर्चा करण्यात येईल, असे बोलले गेले होते. परंतु ३१ मेच्या सभेत इतर विषयांचा समावेश असल्याने त्यावर चर्चा झाली आणि दारुबंदीची चर्चा करण्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्यात यावी, असा सल्ला सभेत देण्यात आला. त्यामुळे ३१ मे ला दारूबंदीचा विषय घेण्यात आला नाही. पुढे दारुबंदीसाठी विशेष ग्राम सभा बोलावून दारुबंदीवर विस्तृत चर्चा करण्यात येईल.-योगेश राऊतसरपंच, आमगाव खुर्द