शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ महिलेला हलविले नागपूरच्या मनोरुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 21:23 IST

मागील वर्षभरापासून जवळील ग्राम अंभोरा येथील बसस्थानकात आश्रयाला असलेल्या मनोरूग्ण महिलेला येथील काही सामाजीक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन नागपूरच्या मनोरूग्णालयात हलविले. शकुंतला घनश्याम देवर (३५,रा. कादोकला, जि.केऊझर, ओडीसा) असे त्या महिलेचे नाव आहे.

ठळक मुद्देसामाजिक कार्यर्त्यांचा पुढाकार : वर्षभरापासून अंभोराच्या बसस्थानकात आश्रय

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वर्षभरापासून जवळील ग्राम अंभोरा येथील बसस्थानकात आश्रयाला असलेल्या मनोरूग्ण महिलेला येथील काही सामाजीक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन नागपूरच्या मनोरूग्णालयात हलविले. शकुंतला घनश्याम देवर (३५,रा. कादोकला, जि.केऊझर, ओडीसा) असे त्या महिलेचे नाव आहे.शकुंतला ग्राम अंभोरा येथील बसस्थानकात मागील वर्षभरापासून आश्रय ेघेऊन होत्या. बसस्थानकाच्या बाजूला लहान चहाटपरी चालविणारे शाहबाज सलीमुद्दीन शेख (रा.आंभोरा) यांनी तिला जेवण दिले. परंतु तिच्या पुनवर्सनासाठी कुणाचेही हात पुढे आले नाही. अचानक सप्टेंबर महिन्यात येथील जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागातील शाखा अभियंता वासुदेव रामटेककर हे कामानिमीत्त जात असताना त्यांचे शकुंतलाकडे लक्ष गेले. त्यांनी तिला सहानुभूतीपूर्वक विचारपूस केली असता तिने आठवणीतल्या काही गोष्टी त्यांना सांगितल्या.या आधारावर रामटेककर यांनी केऊझर (ओडीसा) येथील पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून शुकंतलाच्या घरापर्यंत माहिती पाठविली. यात तिचे वडील मरण पावले असल्याचे कळले. तर भावंडांनी आम्ही गरीब आहोत तिचा उपचार किंवा पालनपोषण करू शकत नाही असे सांगून आपले हात झटकले. यावर रामटेककर यांनी महिला व बाल कल्याण विभागाकडे अर्ज करून शासनाच्या योजनेप्रमाणे त्या महिलेचे पुनवर्सन करण्याची विनंती १९ नोव्हेंबर रोजी केली होती.या विनंतीवरून महिला व बाल कल्याण विभागाने रावणवाडी पोलीस ठाण्यात पत्र देऊन तिची वैद्यकीय तपासणी करण्यास सांगीतले. मात्र रावणवाडी पोलिसांनी महिला व बाल कल्याण विभागाच्या पत्राकडे लक्ष दिले नाही.अशात रामटेककर यांनी पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांच्याकडे धाव घेतली व प्रकरणाची माहिती दिल्यानंतर बैजल यांनी लगेच रावणवाडी पोलिसांना आदेश देऊन त्या महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यास भाग पाडले. त्यानुसार शनिवारी (दि.२२) शकुंतलाची वैद्यकीय तपासणी करून नागपूरच्या मनोरूग्णालयात दाखल करण्यात आले.यासाठी पोलीस हवालदार दुबेलाल उईके, सुनील सेगोकर, सविता बिसेन व वैशाली सांदेल यांनी सहकार्य केले.शासकीय महिला आश्रमात तिचे होणार पुनवर्सनमनोरूग्णालयात उपचार करून तिच्या प्रकृतीत सुधार झाल्यानंतर शकुंतलाला शासकीय महिला आश्रमात पुनवर्सनासाठी ठेवले जाणार असल्याचे मनोरूग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. रामटेककर यांनी यापूर्वी रस्त्यावर अस्वस्थ आढळलेल्या चार महिलांना पुनवर्सनासाठी नागपूरला पाठविले आहे हे विशेष.