शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या आंदोलनामुळे फी वाढ रद्द

By admin | Updated: July 18, 2016 00:04 IST

आंधळगाव येथील जि.प. विद्यालयातील शाळा समितीने अकराव्या वर्गातील प्रवेश घेण्यासाठी फी वाढ केली होती.

आंधळगाव : आंधळगाव येथील जि.प. विद्यालयातील शाळा समितीने अकराव्या वर्गातील प्रवेश घेण्यासाठी फी वाढ केली होती. या अवाजवी फी वाढीच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन दिनांक १५ जुलै रोजी दुपारी १ वाजता विद्यालयासमोर करण्यात आले.फी वाढ रद्द करण्याचा निर्णय प्राचार्य बोळणे यांनी घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयातील दहावीतून उत्तीर्ण झालेले व बाहेरगावातील बरेचसे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. अकरावी विज्ञान व कला शाखेत प्रवेश घेण्यासाठी शाळा समितीने मागील महिन्यात जि.प. सदस्य राणीताई ढेंगे व पदाधिकाऱ्यांनी प्रवेश फी मोठी वाढ केली होती. वाढविलेली फी रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या ४ जुलै प्राचार्य बोळणे यांना निवेदन देण्यात आले होते. शासनाच्या परिपत्रकाच्या विरुद्ध शाळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश फी वाढविली होती. या वाढीव फी च्या विरोधात जि.प. विद्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा उपप्रमुख राजेश बुराडे, तालुका प्रमुख हंसराज आगासे, नरेश उचिबगले तुमसर, पवन चव्हाण, प्रा.देवेंद्र रंभाड, शिवशंकर द्रुगकर, राजू मते इत्यादी उपस्थित होते. वक्त्यांची भाषणे होवून प्राचार्य बोळणे यांना निर्णय मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आली. रस्त्यावरच ठिय्या मांडून शिवसैनिकांनी प्राचार्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. प्राचार्यांनी स्वत: येवून चर्चेसाठी बोलाविले. त्यांच्या कक्षात नायब तहसीलदार थोटे, उपशिक्षणाधिकारी पडोळे, गटशिक्षणाधिकारी गाढवे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख राजेश बुराडे, शिवशंकर द्रुगकर, देवेंद्र रंभाड, हंसराज आगाशे, नरेश उचिबगले, राजू मते, गोवर्धन मारवाडे यांच्याशी चर्चा करण्यात आली. मुख्याध्यापक व पदाधिकाऱ्यांनी पालकांची दिशाभूल केली. अतिरिक्त वाढीव तुकडीकरिता शासन कोणतेही वेतन देत नाही, त्यामुळे आम्हाला प्रवेश फी जास्त घ्यावी लागते. चर्चेमध्ये उपशिक्षणाधिकारी पडोळे, गटशिक्षणाधिकारी गाढवे यांनी वाढीव तुकडीकरिता लागणाऱ्या शिक्षकांचे वेतन जि.प. शिक्षण विभागातून होत असते. याकरिता प्रवेश फी वाढ करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. मागील वर्षाचे अंदाजे ४० हजार रुपये शिल्लक असल्याने या मधूनच आपल्या शाळेच्या गरजा पूर्ण होत आहे. त्याकरिता प्रवेश फी मध्ये वाढ न करता पाचशे रुपये ठेवण्यात यावे असे ठरविण्यात आले. त्यामुळे वाढविलेली फी रद्द करण्यात आली. आंदोलनाच्या यशस्वितेसाठी धनराज पाटील, भगवान विठोले, केशव कावळे, कैलाश झंझाड, कैलाश शेंडे, नरेश चापरे, दशरथ बोरकर व गावकऱ्यांनी आंदोलनात भाग घेऊन सहकार्य केले. (वार्ताहर)